mahatma-gandhi 
देश

"हे राम' म्हटल्याबद्दलच्या विधानाचा विपर्यास 

पीटीआय

गांधीजींच्या वैयक्तिक सचिवांचा दावा 

चेन्नई - महात्मा गांधीजी गोळी लागल्यावर "हे राम' म्हटले नाही, असे मी कधीही म्हटले नव्हते, असा दावा गांधीजींचे तत्कालीन वैयक्तिक सचिव वेंकिता कल्याणम यांनी आज केला. 

वेंकिता कल्याणम (वय 96) हे 1943 ते 1948 या काळात गांधीजींचे वैयक्तिक सचिव होते. 2006 मध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये कल्याणम यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली होती. "नथुराम गोडसेने गोळी मारल्यावर गांधीजी "हे राम' असे म्हटले नव्हते,' असे कल्याणम म्हणाले होते. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी कल्याणम यांचे हे विधान चुकीचे असल्याचे तेव्हाच म्हटले होते. आज मात्र आपल्या विधानाबाबत बोलताना कल्याणम म्हणाले की, माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. गोळी लागल्यानंतर गांधीजी "हे राम' म्हटल्याचे मी ऐकले नाही, असे मी म्हणालो होतो. गांधीजींना गोळी लागल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळात मला काही ऐकू आले नाही. कदाचित ते "हे राम' म्हटले असतील. गोडसेने गांधीजींना एकदाच मारले, मात्र त्यांच्या शिकवणीचा अवलंब न करून राजकीय पक्ष त्यांना रोज मारत आहेत, अशी टीकाही कल्याणम यांनी आज केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Global Warming: जागतिक तापमानवाढीचा वेग दुप्पट; पृथ्वीच्या तापमानात दशकात 0.35 अंशांनी वाढ

ना विराट, ना डिव्हिलियर्स! २१ वर्षांपासून धोनीचा हा विश्वविक्रम कायम; आजही एकाही फलंदाजाला मोडता आला नाही, श्रीलंकेविरुद्ध काय घडलं होतं?

Viral Video: ज्यांनी इमारत उभी केली, त्यांनाच लिफ्टमध्ये जागा नाही! २१ मजले डोक्यावर ओझं घेऊन चढणाऱ्या मजुराचा VIDEO पाहून डोळे पाणावतील!

Marathi News Live Updates : नितेश कराळेंना मिळालेली मते भाजपची नव्हती, पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर भाजपचे आत्मपरीक्षण

Satara Politics: जयकुमार गोरेंचे खासदार उदयनराजेंसमवेत गुफ्तगू; जलमंदिर पॅलेसमध्‍ये सदिच्‍छा भेट; मतांच्‍या बेरजेसाठी तासभर चर्चा

SCROLL FOR NEXT