farmer protest1.j 
देश

दिल्ली सीमेवर स्थानिक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कृषी कायद्याविरोधात सिंघू बॉर्डरवर सुरु असलेल्या आंदोलनास्थळी शुक्रवारी मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळाला. काही स्थानिक लोकांनी शेतकऱ्यांना हटवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक केली. त्यावेळी पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधूर करावा लागला. स्वत:ला स्थानिक सांगणाऱ्या जमावाने शेतकरी करत असलेल्या आंदोलनाला विरोध करत त्यांनी जागा रिकामी करण्याची मागणी केली होती. 

कृषी कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर सुरु असणाऱ्या धरणे आंदोलनस्थळी गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. याचवेळी स्वत:ला स्थानिक म्हणणाऱ्या लोकांनी घटनास्थळी येऊन घोषणाबाजी सुरु केली. शेतकऱ्यांनी याठिकाणाहून हटावं अशी त्यांनी मागणी केली. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रूधूर कांड्या फोडाव्या लागल्या. 

मिळालेल्या माहितीनुसार सिंधू बॉर्डरवर शुक्रवारी सकाळपासून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जवळपास 15 अतिरिक्त कंपनी अर्धसैनिक बल जवानांना तैनात करण्यात आलं आहे. स्थानिक पोलिसांसोबत स्पेशल कमिश्नर लॉ अँड ऑर्डर संजय सिंह घटनास्थळी पोहोचले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी सुरक्षा व्यवस्थेप्रकरणी ब्रिफिंग घेत आहेत. 

सिंघू बॉर्डर आणि आसपासच्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. जवळपासच्या तीन किलोमीटर अंतरावरील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलन मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव होता, पण पुन्हा शेतकरी दिल्ली सीमेवर जमत असल्याचं दिसून येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT