Sahitya Sammelan sakal
देश

Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाची यंदा दिल्लीवारी ; साहित्य महामंडळाच्या मुंबईतील बैठकीत शिक्कामोर्तब

आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन यंदा राजधानी दिल्लीत होणार आहे.

राजेंद्र पाटील - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन यंदा राजधानी दिल्लीत होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी येथे झालेल्या बैठकीत यंदाचे संमेलन दिल्लीत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी सांगितले. १९५४ नंतर, म्हणजेच ७० वर्षांनी दिल्लीत साहित्य संमेलन भरणार आहे.

९८ व्या साहित्य संमेलनासाठी यंदा सात संस्थांची निमंत्रणे आली होती. त्यापैकी स्थळनिवड समितीने तीन ठिकाणची पाहणी केली. त्यात पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची इचलकरंजी शाखा, मुंबईतील नॅशनल लायब्ररी आणि दिल्लीतील सरहद संस्थेच्या जागांना भेटी देण्यात आल्या. त्यात संमेलनासाठी जागा, निवासव्यवस्था, संस्थेचे मनुष्यबळ, पुस्तक प्रदर्शनासाठीची जागा आदींचा विचार करून दिल्लीच्या सरहद संस्थेची निवड करण्यात आली. या निर्णयाला रविवारी मुंबईत झालेल्या महामंडळाच्या सभेत एकमताने मान्यता देण्यात आली. ‘‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा वाढावा, त्यासोबतच दिल्लीतील मराठी भाषारसिकांमधील सुसंवाद वाढण्यासाठी दिल्लीतील संमेलन फायदेशीर ठरेल. तसेच सरहद संस्थेचा अनुभव, त्यांच्याकडील मनुष्यबळ आणि दिल्लीतील तरुणांची संख्या पाहता, हे संमेलन दिल्लीत घेण्याचा निर्णय घेतला,’’ असे तांबे यांनी सांगितले.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेत १९५४ मध्ये दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते; मात्र त्या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अस्तित्वात नव्हते. १९६४-६५ मध्ये महामंडळाची स्थापना झाल्यावर पहिलेच आणि एकंदरीत ४६ वे साहित्य संमेलन हैदराबादमध्ये प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. दरम्यान, सभेला तांबे यांच्यासह महामंडळाचे उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, प्रदीप दाते, सुनीताराजे पवार, डॉ. रामचंद्र काळुंखे आदी उपस्थित होते.

सहा वर्षांपूर्वीही होती संधी

सहा वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत घेण्याचा निर्णय महामंडळाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी घेतला होता; मात्र ऐनवेळी दिल्लीतील संबंधित आयोजकांनी कच खाल्ल्याने हे संमेलन दिल्लीऐवजी बडोद्याला घ्यावे लागले होते.

महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच राजधानी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होत आहे. सरहद संस्थेचे निमंत्रण स्वीकारून त्यांना आयोजनाची संधी दिल्याचा आनंद आहे. अभिजात मराठीच्या दृष्टीने राजधानीत संमेलन होण्यासाठी बऱ्याच वर्षांची प्रतीक्षा होती. मराठीचा दिल्लीतील संपलेला सक्षम आणि समर्थ दबाव गट निर्माण व्हायला या संमेलनाने निश्चितच चालना मिळेल.

- श्रीपाद भालचंद्र जोशी, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

अध्यक्षांची निवड पुण्यात होणार

९८ व्या संमेलनाचे अध्यक्ष निवडण्यासाठी महामंडळाची पुण्यात पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे. त्यात दिल्लीतील संमेलनाचे अध्यक्ष कोण होणार, हे निश्चित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT