Rafale 
देश

Breaking : आणखी ३ राफेल विमानं भारतात दाखल!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली (पीटीआय) : शत्रूला धडकी भरवणाऱ्या राफेलच्या तीन विमानाचा दुसरा ताफा बुधवारी (ता.४) फ्रान्सहून बुधवारी रात्री ८.१४ वाजता गुजरातच्या जामनगर हवाई तळावर दाखल झाला. यासंदर्भात हवाई दलाने ट्विटरवर माहिती दिली आहे. फ्रान्सहून भारताकडे झेपावलेल्या राफेल विमानांनी वाटेत कोठेही थांबा घेतला नाही. तत्पूर्वी राफेलच्या पाच विमानाचा ताफा २८ जुलै रोजी भारतात पोचला होता. या विमानांचा १० सप्टेंबर रोजी भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला आहे.

हवाई दलाला आणखी तीन राफेल लढाऊ विमाने मिळाली. बुधवारी सकाळी तीनही राफेल विमान फ्रान्सकडून भारताकडे झेपावले. भारताने फ्रान्सकडून ३६ राफेल विमान खरेदी करण्याबाबत करार केला आहे. यानुसार बुधवारी तीन विमान दाखल झाल्याने आता राफेल विमानांची एकूण संख्या आठ झाली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीनशी संबंध ताणलेले असताना लडाख येथे राफेल विमान तैनात केले आहेत.

सध्या राफेल विमानासाठी वेगवेगळ्या बॅचमधील वैमानिकांना फ्रान्समध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. भारताला फ्रान्सकडून पुढील वर्षात एकूण २१ विमान मिळणार आहेत. सध्या भारताकडील राफेल विमानांची संख्या आत आठ आहे. दसॉल्ट कंपनी जानेवारीत आणखी तीन विमाने भारताला सुपूर्द करतील. त्यानंतर मार्च महिन्यात तीन विमान आणि यानंतर सात विमानांचा ताफा दिला जाईल.

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाला पुन्हा धमकीचा मेल, अभिनेते अमिताभ बच्चन यांचाही उल्लेख

फक्त १० रुपयांत सोनं खरेदीची संधी! धनत्रयोदशीला 'या' ६ प्लॅटफॉर्मवर मिळतायत खास ऑफर्स

पालकांचा पगार ठरणार नाही अडथळा! OBC आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, IAS-IPS होण्याचा मार्ग मोकळा? केंद्र सरकारला झटका!

Latest Marathi News Update : गंजम जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त गावात आणखी पाच मृतदेह सापडले

Business: 13व्या वर्षी खिशात फक्त 35 रुपये! हॉटेलमध्ये फरशी पुसण्यापासून सुरुवात; पावभाजीने बदललं नशीब, आज उभा केला 111 कोटींचा ब्रँड!

SCROLL FOR NEXT