Second Class Student Complaint in Police Station Telangana Google
देश

'मी अभ्यास करत नाही म्हणून...', दुसरीतील विद्यार्थ्याची थेट पोलिस ठाण्यात धाव

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या मुलाने थेट पोलिस ठाण्यात (Police Station) धाव घेतली. त्याने आपल्या शिक्षकाची तक्रार नोंदवण्याची विनंती पोलिसांना केली. त्याचे कारण ऐकून महिला पोलिस निरीक्षक देखील हैराण झाल्या. तेलंगणातील (Telangana) महबूबाबाद जिल्ह्यातील बयाराम मंडल येथे ही घटना घडली.

अनिल नाईक, असे या मुलाचे नाव आहे. तो एका खासगी शाळेत शिकतो. याच परिसरात पोलिस ठाणे देखील आहे. एक दुसऱ्या वर्गात शिकणारा मुलगा अचानक पोलिस ठाण्यात आला. त्याला एकट्याला पाहून तो हरवला असावा असं पोलिसांना वाटलं. त्यानंतर पोलिस निरीक्षक रमादेवी यांनी तू इथं का आलास? असं मुलाला विचारलं. त्याने दिलेले उत्तर ऐकून रमादेवी देखील हैराण झाल्या. मला माझ्या शिक्षकाने मारहाण केली आहे. त्यामुळे त्यांची तक्रार नोंदवायची आहे, असं त्या मुलानं सांगितलं. त्याला कारण विचारलं असता, मी अभ्यास करत नव्हतो म्हणून मारलं, असं त्या मुलानं सांगितलं.

पोलिस निरीक्षक रमादेवी यांनी या मुलाची तक्रार शांतपणे ऐकून घेतली. त्यानंतर त्या मुलाला घेऊन शाळेत पोहोचल्या. तिथे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी ऐकायला तयार नव्हता. त्या विद्यार्थ्याचं समुपदेशन करण्यात आलं. त्यानंतर वाद मिटला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT