देश

महामार्गावर ३,३०० मीटरची धावपट्टी;उत्तर प्रदेशमध्ये पूर्वांचल महामार्गावर दुसरी धावपट्टी

पीटीआय

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये पूर्वांचल महामार्गावर ३,३०० मीटर लांबीच्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे, महामार्गावर लढाऊ विमानांच्या आपत्कालिन वापरासाठी दोन धावपट्ट्या असणारे उत्तर प्रदेश  हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

याबाबत माहिती देताना उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी म्हणाले, की पूर्वांचल महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. त्याचप्रमाणे, महामार्गावर कुरेभरजवळ ३,३०० मीटर लांबीच्या धावपट्टीचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. या धावपट्टीवर सर्व प्रकारची विमाने उतरू शकतात. हवाई दलही धावपट्टीची लवकरच चाचणी घेण्याची  शक्यता आहे.  

विशेष म्हणजे, या धावपट्टीमुळे उत्तर प्रदेश महामार्गावर दोन धावपट्ट्या असणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. लखनौ - आग्रा महामार्गावर राज्याची पहिली तर पूर्वांचल महामार्गावर दुसरी धावपट्टी आहे. हवाई दलाच्या मिराज २०००, जग्वॉर, सुखोई ३० आणि सुपर हर्क्युलस आदी लढाऊ विमाने  लखनौ - आग्रा महामार्गावर यशस्वीरित्या उतरलेली आहेत. संपूर्ण उत्तर भारत महामार्गांनी उर्वरित देशाशी जोडण्याचा उत्तर प्रदेश सरकारच प्रयत्न आहे. 

महामार्गावर धावपट्टी कशासाठी?
लढाऊ विमानांचे आपत्कालिन परिस्थितीत लॅडिंग व टेक ऑफ करण्यासाठी महामार्गावर अशा धावपट्ट्या तयार केल्या जातात. चीन, पाकिस्तानविरुद्ध युद्धजन्य परिस्थिती उद्‌भवलीच तर या धावपट्ट्यांचा वापर केला जाऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT