Jagannath temple 
देश

Jagannath temple: जगन्नाथ मंदिरात 'रत्न भांडार'ची सुरक्षा करत होते साप? दरवाजे उघडल्यानंतर काय आढळलं?

Jagannath temple Ratna Bhandar: सर्पमित्रांची एक टीम देखील सोबत ठेवण्यात आली होती. असे असताना दरवाजे उघडल्यानंतर खजिन्याची सुरक्षा करताना खरंच साप आढळून आले का? असा प्रश्न मनामध्ये येणे साहजिक आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पुरीच्या जगन्नाथ मंदिरात असलेल्या खजिन्याची सुरक्षा साप करत असतात. अशी गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आता रविवारी तब्बल चार दशकानंतर जगन्नात मंदिराच्या रत्न भांडाराचा दरवाजा उघडण्यात आला होता. यावेळी सर्पमित्रांची एक टीम देखील सोबत ठेवण्यात आली होती. असे असताना दरवाजे उघडल्यानंतर खजिन्याची सुरक्षा करताना खरंच साप आढळून आले का? असा प्रश्न मनामध्ये येणे साहजिक आहे.

अनेक चित्रपटांमध्ये दाखवण्यात येतं की, मोठ्या मंदिरामध्ये रत्न खजिने लपवलेले असतात. त्याची सुरक्षा मोठे-मोठे साप करत असतात. पुरीच्या जगन्नाथ मंदिराबाबतही अशीच आख्यायिका होत्या. पण, प्रत्यक्षात मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर साप आढळून आलेले नाहीत. त्यामुळे या मोठ्या रहस्यावरून पडदा उठला आहे असं आपणाला म्हणता येईल. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे.

पुरीचे जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला साप दिसून आले नाही. शिवाय, दुसरी कोणते जीव देखील आढळून आले नाहीत. खजिन्याचा दरवाजा उघडल्यानंतर साप सापडण्याच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आली होती. एक टीम यासाठी सज्ज होती. पण, आतमध्ये काहीही आढळून आले नाही.

११ सदस्यीय एक स्नेक हेल्पलाईन तयार करण्यात आली होती. याशिवाय काही लोक खजिन्याच्या दरवाज्याबाहेर उभे होते. याशिवाय जिल्हा मुख्यालयाच्या हॉस्पिटलची टीम सज्ज ठेवण्यात आली होती. पण, याची गरज लागलेली नाही. सर्पमित्र महासचिव सुभेंदु मलिक म्हणाले की, आम्ही पूर्णपणे तयार होतो. पण, आमची गरज पडली नाही.

मंदिराचे खजिन्याचे दरवाजे उघडल्यानंतर अनेकांचे आरोग्य बिघडेल. आपत्ती कोसळेल अशा प्रकारची अफवा पसरवली जात होती. पण, आतापर्यंत काहीही वाईट घटना घडलेली नाही. संपूर्ण मंदिरामध्ये सुरक्षा ठेवण्यात आली आहे. जवळपास ८५ रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान मंदिर परिसरात तैनात आहेत. मंदिराच्या खजिन्याचे दरवाजे रविवारी सकाळी उघडण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात रत्न-आभूषणे आढळून आले आहेत.

रत्न भांडारच्या आतमध्ये काय?

-१२ व्या शतकांपासून भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांना अनेक राजांनी महागडे आभूषण, रत्न, मौल्यवान मोती, सोन्याचे दागिने दिले आहेत.

-१९७८ च्या माहितीनुसार, रत्न भांडारात ४५४ प्रकारचे सोन्याचे दागिने अन् २९३ प्रकारचे चांदीचे दागिने आहेत

- ओडिशाच्या एका मॅगझिनच्या रिपोर्टनुसार, सोन्याचे ताट, मोती, पाचू मोठ्या प्रमाणात आहे. १८०५ मधील पुरीचे जिल्हाधिकारी चार्ल ग्रोम यांच्यानुसार, खजिन्यामध्ये १३३३ प्रकारचे आभूषण आहेत.

- एका अफवेनुसार, रत्न भंडारमध्ये १२८ गोल्ड कॉईन, १२९७ चांदीचे काईन, १०६ कॉपर कॉईन आणि २४ पुरातन गोल्ड कॉईन आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT