army Team eSakal
देश

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

Jammu Kashmir : मागच्या 33 दिवसांत सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे.

सुधीर काकडे

जम्मू-काश्मीर: रविवारी पहाटे शहरातील हरवान (Harvan, Kashmir) भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (LET)चा दहशतवादी मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या परिसरात दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हरवानमध्ये शोध मोहीम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी (Terrorists) जवानांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचं रुपांतर चकमकीत झालं.

दहशतवाध्यांकडू झालेल्या गोळीबारानंतर जवानांनी देखील प्रत्यूत्तरादाखल गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मागच्या 33 दिवसांत श्रीनगरमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलीस, एसएफवरील हल्ले आणि नागरिकांच्या हत्येसह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. खोऱ्यातील, विशेषतः श्रीनगरमधील शांतता बिघडवण्यामागे पाकिस्तानी शक्ती असल्याचे यावरून दिसून येतं असल्याचं काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितलं.

ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये सैफुल्ला, अबू खालिद आणि शवाज या तिघांचा समावेश असून, तिघेही पाकिस्तानच्या कराचीचे रहिवासी आहेत. हे सर्व लष्कर ए तोयबाशी संबंधित आहेत. त्यांनी 2016 मध्ये घुसखोरी करून हरवानच्या सामान्य भागात वेगवेळ्या कारवाया केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Kolhapur News : आबाजीच गोकुळचे ‘बाप’, अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT