Sengol Of India Sakal
देश

Sengol Of India : पंडित नेहरुंनाही सेंगोल मिळाला, पण माऊंटबॅटनकडून नाही; काँग्रेसचा दावा खरा की खोटा?

'पंडित नेहरू, जे सामान्यतः मंदिरे किंवा धार्मिक समारंभांना उपस्थित न राहण्यासाठी ओळखले जात होते, त्यांनीही धार्मिक पंडितांचा आशीर्वाद घेण्यास सहमती दर्शविली.

वैष्णवी कारंजकर

काँग्रेस नेते जयराम रमेश सेंगोलबद्दल म्हणाले होते, "माऊंटबॅटन, राजाजी आणि नेहरूंशी संबंधित कोणताही दस्तऐवज नाही हे सिद्ध करण्यासाठी की हा राजदंड ब्रिटिशांकडून भारतात सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून वापरला गेला होता."

यावर गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलं होतं की,काँग्रेस पक्ष भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा इतका तिरस्कार का करतो? तमिळनाडूतील एका पवित्र शैव मठाने पंडित नेहरूंना भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून एक पवित्र सेंगोल दिलं होतं, परंतु 'वॉकिंग स्टिक' असं समजून ते संग्रहालयात पाठवलं गेलं.

दोन्ही नेत्यांचं म्हणणं वाचून तुमच्या मनात प्रश्न नक्कीच निर्माण होत असतील की यामागचं सत्य काय आहे? यासाठी काही दस्तावेज उपलब्ध आहेत, तसंच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही आपल्या भाषणामध्ये याविषयी माहिती दिली होती.

'जवाहरलाल नेहरू यांनीही भारताचे पहिले पंतप्रधान होण्याच्या आधी धार्मिक गोष्टी केल्या होत्या. एका हिंदू मठाचे प्रमुख श्री अंबलावन देसीगर यांचे दोन दूत दक्षिण भारतातील तंजोर इथून आले होते. अंबलावना असं वाटलं की नेहरू, खरं तर, भारत सरकारचे पहिले भारतीय प्रमुख म्हणून सत्ता घेत आहेत. त्यांनी, प्राचीन हिंदू राजांप्रमाणे, हिंदू ऋषीमुनींकडून शक्ती आणि अधिकाराची प्रतीकं प्राप्त केली पाहिजेत. (New Parliament News)

दोन्ही दूतांनी आपले लांब केस व्यवस्थित वेणीत बांधले होते. त्याच्या छातीवर एकही कपडा नव्हता आणि त्याच्या कपाळावर पवित्र राख लावलेली होती. त्यांनी पूर्ण सन्मानाने नेहरूंच्या घरात प्रवेश केला. दोन मुलं हरणाच्या केसांनी बनवलेले पंखे घेऊन हवा देत होती. एका साधूच्या हातात पाच फूट लांब आणि दोन इंच जाड सोन्याचा राजदंड होता. त्यांनी तंजोरहून आणलेले पवित्र पाणी नेहरूंवर शिंपडले आणि त्यांच्या कपाळावर पवित्र राखेची रेषा काढली. त्यानंतर त्यांनी नेहरूंना पितांबरमची वेशभूषा करून सोन्याचा राजदंड दिला.

'पंडित नेहरू, जे सामान्यतः मंदिरे किंवा धार्मिक समारंभांना उपस्थित न राहण्यासाठी ओळखले जात होते, त्यांनीही धार्मिक पंडितांचा आशीर्वाद घेण्यास सहमती दर्शविली. तंजोरहून संन्याशांच्या मुख्य पुजाऱ्याचे दूत आले.पंडित नेहरू या सर्व धार्मिक समारंभांना बळी पडले, कारण भारतात असं म्हटलं जातं की जुन्या राजांना सत्ता ग्रहण करण्याची ही परंपरागत पद्धत होती.

संध्याकाळी या धार्मिक मिरवणुकांसमोर पुजारी चालतात. त्यांनी तंजोरहून राजदंड आणि पवित्र पाणी सोबत आणलं होतं. त्यांनी आपली भेट पंतप्रधानांच्या चरणी ठेवली. पंडित नेहरूंच्या कपाळावर पवित्र विभूती लावून आशीर्वाद दिला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखन आणि भाषणांवर महाराष्ट्र शिक्षण विभागाने १९७९ मध्ये एक पुस्तक प्रकाशित केलं. सेंगोलचा उल्लेख त्यामध्ये आहेत - '१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्राह्मण भारताचा पंतप्रधान झाल्याच्या निमित्ताने बनारसच्या ब्राह्मणांनी यज्ञ केला. नेहरू त्या यज्ञात बसले नाहीत, ब्राह्मणांनी दिलेला राजदंड घेतला नाही आणि त्यांच्यासाठी आणलेले गंगेचे पाणी प्यायले नाही का?'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT