Digvijay sinha press conference Sakal
देश

गांधी कुटुंबाने एकही पैसा घेतला नाही

ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा

भोपाळ - नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाने एकही पैसा घेतला नाही, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केला. राहुल गांधी सोमवारी सक्तवसुली संचालनालयासमोर हजर राहण्याची अपेक्षा आहे. त्या पार्श्वभूमीवर दिग्विजय यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली.

भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी गांधी कुटुंबावर केलेले आरोप चुकीचे आहेत, असा दावा त्यांनी केला. याप्रकरणी स्वामी न्यायालयात गेले होते, मात्र तेव्हा ते सुनावणीसाठी का उपस्थित राहायचे नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. हे सरकार सुडाच्या भावनेने पेटून उठले आहे आणि त्याच हेतून काम करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर मग आजपर्यंत प्राथमिक चौकशी अहवाल का सादर करण्यात आलेला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस पक्ष अशा प्रकरणांमुळे डगमगून जाणार नाही, असेही दिग्विजय यांनी नमूद केले.

राजकीय पक्षांच्या खर्चावर मर्यादा घालणारा कोणताही कायदा नाही असे निवडणूक आयोगानेही स्पष्ट केले आहे. जेव्हा काळा पैसा नियमित केला जातो तेव्हाच मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला जातो. या प्रकरणात असे काही झालेले नाही, उलटपक्षी नॅशनल हेराल्डला देणी चुकविण्यासाठी काँग्रेसने रक्कम दिली होती, याचा पूर्ण हिशेब असून त्याचे लेखापरिक्षणही झाले आहे.

- दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट कायम; बुधवारी सर्वाधिक तापमान चंद्रपुरात; अकोला, अमरावती किती?

बांगलादेशचा शकिब अल हसन मुंबईत आला; T20 World Cup मधून माघार घेणाऱ्या सरकारच्या निर्णयावर संतापला, म्हणाला...

शाळांना विद्यार्थ्यांच्या रिझल्टची घाई, मुंबईतील अनेक शाळांचे निकाल जाहीर, गुणपत्रिकाचेही वाटप; शिक्षण विभागाचे नियोजन फेल?

Karnataka Congress Crisis : कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! 15 मे रोजी डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? आमदाराच्या दाव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update: बंगळुरूत 'बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटल'जवळ मोठी दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत

SCROLL FOR NEXT