Mallikarjun Kharge  e sakal
देश

मल्लिकार्जुन खर्गे ईडीच्या रडारवर; 'या' प्रकरणी चौकशी सुरु

या प्रकरणामुळं काँग्रेसला कायम अडचणीचा सामना करावा लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना हे आता ईडीच्या रडारवर आहेत. नॅशनल हेरॉल्ड भ्रष्टाचार प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. त्यांना आज ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे. (senior Congress leader Mallikarjuna Kharge summoned by ED case)

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण काय आहे?

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण सन १९३८ मध्ये करण्यात आलेलं एक वर्तमानपत्र होतं. पंडित नेहरु यांनी या वृत्तपत्राचा वापर स्वातंत्र्ययुद्धात केला होता. नेहरुंनी १९३७ मध्ये असेसिएटेड जर्नल बनवलं होतं. ज्यामध्ये तीन वर्तमानपत्रं काढण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये हिंदीत नवजीवन, उर्दूमध्ये कौमी आवाज आणि इंग्रजीत नॅशनल हेरॉल्ड. सन २००८ येईपर्यंत असोसिएट जर्नलनं आता वर्तमान पत्र न छापण्याचा निर्णय घेतला. नंतर ही बाब उघड झाली की, असोसिएट जर्नलवर ९० कोटी कर्जाचा बोजा देखील आहे.

कोर्टात पोहोचलं प्रकरण

सन २०१२ मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हे प्रकरण प्रकाशझोतात आणलं होतं. त्यांनी आरोप केला होता की, काँग्रेस पक्षानं आपल्या पक्षनिधीतून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची कंपनी यंग इंडियाला ९० कोटी रुपये उधार दिले होते. या पैशातून राहुल आणि सोनिया यांच्या कंपनीनं नॅशनल हेरॉल्ड हे वर्तमान पत्र चालवणारी कंपनी असोसिएट जनरल खरेदी केली होती. यानंतर या कंपनीची ५ हजार कोटी रुपयांची संपत्ती अद्यापही गांधी कुटुंबियांकडे आजही असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT