श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याला ठार मारले. या भागात रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती आणि एक दहशतवादी लपून बसला असल्याचा अंदाज लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. लतिफ भट आणि उमर अशी त्यांची नावे आहेत. जवान आणि पोलिसांनी या भागाची नाकेबंदी केली आहे. मागील आठवड्यात याच भागात ‘सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात या दोन दहशतवाद्यांचा समावेश होता, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.