Senior journalist Ved Pratap Vaidik passes away at 78  
देश

Ved Pratap Vaidik Death: हाफिज सईदची मुलाखत घेणारे ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांचे निधन

दहशतवाद्याची मुलाखत घेणारे ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांचे निधन झाले आहे

सकाळ डिजिटल टीम

Latest Marathi News: दहशतवाद्याची मुलाखत घेणारे ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांचे निधन झाले आहे. ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक हे पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदची मुलाखत घेतल्याने चर्चेत होते. 78 व्या वर्षी वैदिक यांनी अखेरचा श्वास घेतला.(Senior journalist Ved Pratap Vaidik passes away at 78 )

2014 मध्ये पाकिस्तानात गेलेल्या वेद प्रताप वैदिक यांनी दहशतवादी हाफिज सईदची भेट घेतली होती.

78 वर्षीय वेद प्रताप बाथरूममध्ये घसरले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

वेद प्रताप वैदिक यांचा जन्म 1944 मध्ये इंदूरमध्ये झाला. १९५८ पासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. ते देशातील मोठे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक होते. ते नवभारत टाइम्स आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाशीही संबंधित होते.

त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय राजकारणात पीएचडी केली. वेद प्रताप वैदिक हे अनेक भारतीय आणि परदेशी संशोधन संस्था आणि विद्यापीठांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत.

वेद प्रताप वैदिक यांनी 1957 मध्ये वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी हिंदीसाठी सत्याग्रह केला आणि पहिल्यांदा तुरुंगात गेले. इंटरनॅशनल पॉलिटिक्स या विषयावर त्यांनी आपले संशोधन हिंदीमध्ये लिहिले, त्यामुळे स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजने (JNU) त्यांची शिष्यवृत्ती थांबवली आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

1966-67 मध्ये या मुद्द्यावर भारतीय संसदेत प्रचंड गदारोळ झाला होता. यानंतर इंदिरा गांधी सरकारच्या पुढाकाराने जेएनयूचे नियम बदलण्यात आले आणि ते मागे घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT