देश

ज्येष्ठ वकील, कायदेपंडित  डॉ. घटाटे यांचे निधन

पीटीआय

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील व कायदेपंडित डॉ. एन. एम. घटाटे (वय ८३) यांचे आज येथे निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी शीला आणि दोन मुले असा परिवार आहे. 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या घनिष्ठ मित्रांमध्ये त्यांची गणना होती. अत्यंत मोकळ्या, मनमिळाऊ व्यक्तिमत्वाचे घटाटे मित्रपरिवारात ‘अप्पा’ नावाने ओळखले जात. ते मूळचे नागपूरचे. रा. स्व. संघाशी त्यांचा जीवनभर संबंध राहिला. त्यांचे वडिल रा. स्व. संघाच्या स्थापनेत सहभागी होते. घटाटे हे कायदा आयोगाचे सदस्य होते. ‘डेथ अंडर द शॅडो ऑफ ज्युडिशियरी’ हे फाशीच्या शिक्षेबाबत विवेचन करणारे पुस्तक त्यांनी लिहिले होते. या मध्ये या शिक्षेची चिकित्सा करतानाच वेगवेगळ्या कालखंडात शिक्षेचे स्वरुप कसे बदलत गेले याचा आढावा त्यांनी घेतला होता. आणीबाणीच्या संदर्भात त्यांनी ‘इमर्जन्सी, कॉन्स्टिट्यूशन अँड डेमॉक्रसी’ हे पुस्तक लिहिले. भारताच्या निःशस्त्रीकरणाच्या धोरणावरही त्यांनी विशेष चिकित्सात्मक ग्रंथ लिहिला. 

कायद्याची पदवी घेऊन दिल्लीला वकिली करण्यासाठी आलेल्या घटाटे यांनी सुरुवातीला कृष्ण मेनन यांचे सहाय्यक म्हणून काम केले. कृष्ण मेनन हे पुढे सक्रिय राजकारणात गेले व संरक्षणमंत्री झाले. घटाटे यांना मेनन यांच्याबद्दल कमालीचा आदर होता. याच काळात ते अटलबिहार वाजपेयी यांच्या सहवासात आले. त्यानंतर त्यांची मैत्री अतूट व अखंड राहिली. वाजपेयी यांनी त्यांच्या तीन अतिनिकटच्या मित्रांपैकी एक म्हणून घटाटे यांना स्थान दिले होते. घटाटे यांनी वाजपेयींच्या संसदीय भाषणांच्या संकलनाचे मोठे काम केले. ‘मेरी संसदीय यात्रा’ या शीर्षकाने त्यांनी तीन खंडात हे संकलन केले. वाजपेयी हे आघाडी सरकारचे पंतप्रधान झाले. त्यांच्या त्या कारकिर्दीच्या अनुषंगाने त्यांनी ‘गठबंधन की राजनीती’ हे एक पुस्तक लिहिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं की महागलं? दोन दिवसांतच भावात मोठा बदल; आजचा ताजा दर पाहा

Pan Masala Plastic Ban : पान मसाला खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Massajog Election: मोठी बातमी! स्व. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख विजयी

Latest Marathi News Live Update : माझा विजय म्हणजे गोरगरीब जनतेचा विजय- देशमुख

'झोपडपट्टीत संपूर्ण बालपण गेल्यावर…' सिद्धार्थ जाधव जुन्या आठवणी सांगताना म्हणाला... लाइट सुरू ठेवण्यासाठी आम्ही

SCROLL FOR NEXT