nitin gadkari
nitin gadkari sakal
देश

व्यावसायिक वाहनांमध्ये सेन्सर, अपघात टाळण्यासाठी गडकरींचा प्लॅन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात अनेकांचा रस्ते अपघातात (road accident) मृत्यू होतो. यामध्ये चालकांच्या चुकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. हे टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मेगा प्लॅन आखला आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी गडकरी काही महत्वाचे निर्णय घेणार आहेत. तसे संकेत त्यांनी दिले आहेत. युरोपियन मापदंडानुसार, व्यावसायिक वाहनांमध्ये सेन्सर (sensor in commercial vehicle) लावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत ट्विट करून त्यांनी माहिती दिली आहे.

वैमानिकांसाठी विमान उड्डाणाचे तास ठरलेले असतात. त्याचप्रमाणे ट्रक चालकांसाठी वाहतुकीचे तास निश्चित असायला पाहिजे. चालक थकल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. तास निश्चित असेल तर हा अपघात टाळता येईल. जिल्हा रस्ते समितीच्या बैठका नियमितपणे व्हाव्यात यासाठी मी मुख्यमंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे लिहिणार असल्याचेही गडकरींनी सांगितले. तसेच व्यावसायिक वाहनांमध्ये सेन्सर लावण्याच्या धोरणावर काम करण्याची सूचना देखील अधिकाऱ्यांना दिली आहे. परिणामी चालकाला झोप येत असेल तर या सेन्सरमुळे त्याला जाग येईल, असंही त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक २१ सप्टेंबरला घेण्यात आली. यावेळी दर दोन महिन्यांनी बैठक घेऊन त्यांचे अपडेट शेअर करण्याचे निर्देश गडकरींनी परिषदेला दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मोदींनी डोळा मारलाय, पण मी जाणार नाही'', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना चिमटा

Raj Thackeray : ''अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही'' राज ठाकरे पुण्यात नेमकं काय म्हणाले?

T20 WC 2024 : 24 मे पूर्वी चार दिवस आधी... बीसीसीआयचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना दिलासा

Sai Sudarshan GT vs CSK : साई सुदर्शनने केला मोठा विक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागं

GT vs CSK Live IPL 2024 : सीएसकेची अवस्था बिकट; डाव सावरणार मिचेल बाद

SCROLL FOR NEXT