serial kisser gang who lip lock women police arrested 4 people including leader of gang  
देश

Serial Kisser Gang : महिलांसोबत लिप लॉक करून पळून जाणारी 'सिरियल किसर गँग' अखेर अटकेत

सकाळ डिजिटल टीम

आपण सगळ्यांनी सीरीयल किलर बद्दल ऐकलं असेल, परण तुम्ही सीरीयल किसर बद्दल माहिती आहे का? बिहारच्या जमुईमध्ये अशाच एका सीरियल किसर गँगचा पर्दाफाश झाला आहे. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी या टोळीचा म्होरक्या आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण दिवसा महिलांची छेड काढतात आणि रात्री चोरीच्या घटना करतात.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी महिसौधी बाबू टोला येथे छापा टाकला. चोरीचा माल जप्त करण्यासाठी पोलिसांनी हा धाड टाकली होती. मात्र येथेच पोलिसांना सीरियल किसर गँगचा म्होरक्या सापडला. तसेच त्याच्या सोबत त्याचे चार साथीदारांना देखील अटक करण्यात आलं. मागील बऱ्याच दिवसांपासून पोलिस यांच्या शोधात होते. सीरीयल किसर गँगचा लीडर महिसौढी मुहल्ला येथील निवासी असून त्याचं नाव मो. अकरम असे सांगण्यात येत आहे.

या गँगच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलिस या आरोंपींची चौकशी करत आहेत. यांच्याजवळ चोरी केलेल्या वस्तू देखील आढळल्या आहेत. तसेच आरोपींच्या इतर सहकाऱ्यांचा देखील पोलिस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सीरीयल किसर महिलींची छेड काढायचे आणि त्यांना किस खरून पळून जायचे. पुन्हा रात्री चोऱ्या देखील करत असत. आता पोलिसांकडून या टोळीच्या इतर सदस्यांचा शोध घेतला जात आहे.

महत्वाचे म्हणजे हा सीरीयल किसर गँगचा लिडीर जमुई येथील रुग्णालय परिसरातील महिला आरोग्य कर्मचाऱ्याशी छेडछाड केली होती. महिलेला एकटी पाहून सीरीयल किसर धावत आला आणि किस करून पळून गेला.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक महिली फोनवर बोलत होती मध्येच एक तरुण तेथे येतो आणि महिलेला जबरदस्तीने किस करू लगतो. ही संपूर्ण घटान तिथे असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. ही घटना १० मार्च रोजीची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

BABAR AZAM: पहिल्या टेस्टमधून बाहेर, पण आता कमबॅकसाठी सज्ज? बाबर आझमच्या फिटनेसवर पाकिस्तान टीम मॅनेजमेंटने दिली मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा जोर धरणार, हवामान विभागाचा अंदाज

Congress on Caste Census: जातगणना प्रक्रियेला काँग्रेसचा तीव्र विरोध ;खर्गे, राहुल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

SCROLL FOR NEXT