covid vaccine covid vaccine
देश

सात ते १२ वयोगटातील मुलांना दिल्या जाणाऱ्या कोव्होवॅक्स लसीला मंजुरी

कोरोनाविरोधात लढण्यासाठी सीरमच्या कोव्होवॅक्स लसीला मंजुरी

एएनआय वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) ७ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्होवॅक्स लसीला मंजुरी दिली आहे. यापूर्वी केंद्रीय औषधी प्राधिकरणाच्या एका तज्ज्ञ समितीने सात ते १२ वयोगटातील मुलांसाठी कोव्होवॅक्स लसीला (Covovax Vaccine) आपात्कालीन उपयोगासाठी मंजुरी देण्याची शिफारस शुक्रवारी केली होती. मात्र आता डीसीजीआयने त्यास मंजुरी दिली आहे. (Serum Institute Of India's Covovax Vaccine For Children Age 7 To 12 Years By DCGI Approves)

एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे, की कोव्होवॅक्सला केवळ आपात्कालीन स्थितीत मर्यादित वापरासाठी मंजुरी दिली गेली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (Serum Institute Of India) सरकारी आणि नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी १६ मार्च रोजी आपात्कालीन उपयोग प्राधिकरणसाठी अर्ज सादर केला होता. यापूर्वी डीसीजीआयने २८ डिसेंबर रोजी प्रौढ नागरिकांना आपात्कालीन स्थितीत मर्यादित वापरासाठी कोव्होवॅक्सला मजुरी दिली होती.

नऊ मार्च रोजी १२-१४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. दुसरीकडे देशभरात कोरोना लसीकरण अभियान गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. त्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT