Madhya Pradesh Announces School Renovation, Free Laptops and New Teacher Recruitment

 

esakal

देश

Seva Sankalpa Abhiyan: दोन वर्षांत जीर्ण शाळांचे नूतनीकरण; मोफत लॅपटॉप-ई-स्कुटीसह शिक्षक भरतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Seva Sankalpa Abhiyan 2026, School Renovation, Laptop and Teacher Recruitment. मध्य प्रदेशात पुढील दोन वर्षांत जीर्ण शाळांचे नूतनीकरण करण्याची घोषणा करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप, ई-स्कुटी देण्यासह शिक्षकांची नवीन भरती केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मध्य प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशात राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियान-२०२६’ अंतर्गत आयोजित ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या राज्यस्तरीय चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील तब्बल ५० लाख विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून नवा विक्रम केला.

६ ऑक्टोबर रोजी भोपाळमधील टी.टी. नगर येथील मॉडेल स्कूलमध्ये स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा झाला. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि शालेय शिक्षण मंत्री उदय प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

आयुषी अहिरवार आणि श्रीजी मिश्रा अव्वल

राज्यातील ४२ हजारांहून अधिक शासकीय आणि खासगी शाळांमधील इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर या स्पर्धेत सहभाग घेतला.

चित्रकला स्पर्धेत नरसिंगपूरची आयुषी अहिरवार हिने प्रथम क्रमांक पटकावला. बालाघाटच्या डीनू बोपचे हिने द्वितीय, तर टीकमगडच्या आयुषी सिद्धी नामदेव हिने तृतीय क्रमांक मिळवला. रायसेनच्या अनुभव राजपूत आणि दिंडोरीच्या साजन कुमार बर्मन यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धेत अशोकनगर जिल्ह्यातील मुंगावली येथील सेंट मीरा कॉन्व्हेंट स्कूलची श्रीजी मिश्रा हिने प्रथम क्रमांक मिळवला. धारची छवी मंगरेलिया द्वितीय, तर गुना येथील राणी रजक हिने तृतीय क्रमांक पटकावला.

श्रीजी मिश्रा हिने आपल्या भाषणात ‘माझ्या स्वप्नातील भारत’ची कल्पना मांडताना प्रत्येक मुलाला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची समान संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दोन वर्षांत जीर्ण शाळांचे नूतनीकरण

या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि शिक्षण क्षेत्रासाठी विविध घोषणा केल्या. राज्यातील जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या शाळांचे पुढील दोन वर्षांत नूतनीकरण करून आधुनिक आणि सुरक्षित इमारती उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोफत लॅपटॉप, ई-स्कुटी, गणवेश आणि पाठ्यपुस्तके देण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्यात आला असून, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांची नवीन भरती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी विशेष बससेवेची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

२०२७ ‘युवा वर्ष’ म्हणून साजरे होणार

मध्य प्रदेशात २०२७ हे वर्ष ‘युवा वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राज्याच्या विकासाचा आराखडा तयार करताना तरुणांकडूनही सूचना मागवण्यात येणार आहेत.

वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्यात १२ नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच १२ नवीन विद्यापीठे सुरू करण्याची योजनाही मांडण्यात आली.

तरुणांना रोजगाराच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियमित वार्षिक परीक्षेबरोबरच वर्षातून एक विशेष एमपीएससी परीक्षा घेण्याची घोषणाही करण्यात आली.

पंतप्रधान मोदींच्या कार्याचा उल्लेख

यावेळी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या कार्याचा उल्लेख केला. डिजिटल इंडिया, यूपीआय व्यवहार आणि नव्या संसद भवनासह देशातील विविध विकासकामांचा त्यांनी गौरव केला.

२०४७ पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुणांची भूमिका महत्त्वाची राहणार असून, विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या भविष्यासाठीची स्वप्ने आणि संकल्प रुजवणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Governor Inflation: साखर-कांद्याने वाढवली महागाईची चिंता! दिवाळीत महागाई वाढणार? RBIचा मोठा इशारा

कियारा अडवाणी- सिद्धार्थ मल्होत्रा यांनी पुन्हा एकदा दिली गुड न्यूज; मुलगी सामायराही सोबत; फोटो व्हायरल

Navratra 2026: नवरात्री दरम्यान दुर्गा पूजेसाठी कडक नियमावली; मंडप आणि विसर्जन मिरवणुकीत डीजेवर पूर्ण बंदी!

Latur Professor Murder : अनैतिक संबंधातून कोल्हापूरच्या प्राध्यापकाची हत्या; लातूरमधून अपहरण करुन बीडमधील खडी क्रशरवर नेले अन्... चौघांना अटक

IND U19 vs AUS U19 : तन्मय बलोडाच्या १४ विकेट्स अन् ऑस्ट्रेलियाची दाणादाण; भारताने ५ चेंडूंत जिंकली मॅच, मालिका खिशात

SCROLL FOR NEXT