bus accident 
देश

Delhi-Jammu NH: बसचा अक्षरशः चुराडा, वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

bus accident on National Highway: बस अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झालाय, तर २० जण जखमी झाले आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- बस अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झालाय, तर २० जण जखमी झाले आहेत. अंबाला-दिल्ली- जम्मू राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. एका ट्रकने मिनी बसला जोराची धडक दिली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, मिनी बसचा पूर्ण चुराडा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बसमधून एकाच कुटुंबातील ३० सदस्य जम्मू काश्मीरमध्ये वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते. त्यावेळ हा अपघात झालाय.

माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एक कुटुंब घेऊन जात असलेल्या मिनी बसला अंबाला येथे एका ट्रकची जोराची धडक बसली. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार, ट्रकने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे मागून घेणाऱ्या मिनी बसने ट्रकला मागून जोराची धडक दिली. मिनी बस चालक वेळत गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही आणि त्याने ट्रकला मागून ठोकले.

घटनास्थळावरील दृश्य भयानक आहेत. यावरुन मिनी बसची किती जोराची धडक बसली असेल याचा अंदाज येतो. ट्रकच्या समोर एक कार होती. कार चालकाने पेट्रोल पंप पाहून डाव्या दिशेने टर्न घेतला. त्यामुळे ट्रक चालकाला अचानक ब्रेक मारावा लागला. पण, मागे असलेल्या मिनी बसला वेळेत ब्रेक मारता आला नाही.

तीन लोकांचा जागीच मृत्यू झालाय,तर इतर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २० जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. एफआयआर दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT