Several injured after clashes break out between BJP workers and farmers in Muzaffarnagar 
देश

उत्तर प्रदेशात भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी; अनेकजण जखमी

सकाळ डिजिटल टीम

भाजप कार्यकर्ते आणि शेतकरी ग्रामस्थ यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे सोमवारी घडला. या हाणामारीत अनेकजण जखमी झाले असून यावेळी दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांनी या घटनेबाबत ट्विट केलं आहे. 

चौधरी यांनी ट्विट करत म्हटलं, "येथील सोराम गावात भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी अनेकजण जखमी झाले आहेत. जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलायचं नसेल तर किमान त्यांना नीट वागणूक तरी द्या. शेतकऱ्यांचा सन्मान करा. नव्या शेतकरी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींची ही गुंडागर्दी ग्रामस्थ सहन करतील का?" 

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या २० फेब्रुवारी रोजी मुजफ्फरनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या ठिकाणी त्यांनी सभा घेतली होती तसेच जनतेला संबोधित केले होते. 

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देताना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी महापंचायतही भरवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Road Inspection: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रस्ते दुरुस्तीचा बोजवारा; मिरवणूक मार्गांवर खड्डे, धोकादायक चेंबर अन् फुटपाथ

Palghar Bus Tragedy: शिवशाही बसच्या डिकीचे झाकण उघडताच शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्ते दुरुस्तीचा बोजवारा

Video: "इतका स्मार्ट दाखवलाय?" वैभव सूर्यवंशी 1980sचा Retro लूक पाहून शॉक; बुमराह, ईशान, श्रेयसनेही दिल्या भन्नाट रिअॅक्शन

Likhita Japa Sadhana: लिखित जपसाधना

SCROLL FOR NEXT