

Team India Cricketer React to Viral 1980s Retro Look
Sakal
सोशल मीडियावर सध्या एका व्हायरल ट्रेंडची जोरदार चर्चा आहे, तो ट्रेंड म्हणजे १९८० च्या दशकातील रेट्रो लूक. या ट्रेंडने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय. AI च्या मदतीने लोकं त्यांच्या फोटोला थेट १९८० चा रेट्रो लूक (1980s Retro Look Trend) देत आहेत.
त्यामुळे अनेकांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर ब्लेझर्स, विंटेज जीन्स आणि बेल बॉटम्स, जाडजूड एव्हिएटर्स आणि भरगच्च केशरचना अशा शैलीतील रेट्रो फोटो दिसत आहेत. यात सेलिब्रेटीही मागे राहिलेले नाहीत. आता असेच रेट्रो लूक भारताच्या टी२० संघातील खेळाडूंचेही समोर आले आहेत आणि त्यावर त्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.