Swati Maliwal Video esakal
देश

Swati Maliwal Video: 'वडीलच माझं लैंगिक शोषण करायचे' महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितली आपबिती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः दिल्लीच्या महिला आयोग अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या बालपणीचा हृदय पिळवटून टाकणारा एक अनुभव शेअर केला आहे. त्यांचे वडील लहानपणी त्यांचं शोषण कसं करायचे, याबाबत त्यांनी आपबिती सांगितलं.

दिल्लीतल्या एका पुरस्कार सोहळ्यामध्ये दिल्लीच्या महिला आयोग अध्यक्ष स्वाती मलीवाल यांनी लहानपणी वाट्याला आलेलं दुःख व्यक्त केलं. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या की, मी चौथीपर्यंत माझ्या वडिलांसोबत होते. तेव्हा माझ्यावर माझ्याच वडिलांकडून खूप अत्याचार झाले.

माझे वडील माझं लैंगिक शोषण करायचे, मला मारहाण करायचे. एवढंच नाही तर माझ्या वेणीला धरुन माझं डोकं भींतीवर आपटायचे. त्यामुळे मी रक्तबंबाळ व्हायचे, असा अनुभव त्यांनी शेअर केला.

'जी व्यक्ती अत्याचार सहन करते तीच व्यक्ती इतरांचं दुःख समजू शकते आणि जगाला हादरे देण्याची हिंमत तिच्यामध्येच असते. मीही अशाच दुःखातून आले आहे. माझे आजी-आजोबा आणि मावशीमुळे त्या अत्याचारातून बाहेर पडले' असा हृदयद्रावक अनुभव त्यांनी शेअर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेतील मृताच्या पत्नीनं संपवंल आयुष्य, २ चिमुकल्या मुली महिन्याभरात आई-वडिलांच्या मायेला पोरक्या

Vijay Mallya News: मल्ल्या-बँकांमधील वाद संपवण्याची गरज! मुंबई हायकोर्टाचे मोठे निरीक्षण; काय म्हणाले कोर्ट?

World Organ Donation Day 2026: फक्त अवयवदानाचा फॉर्म भरून होत नाही! मृत्यूनंतर तुमचे अवयव कसे दान केले जातात? जाणून घ्या प्रत्येक टप्पा

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

Horoscope: अचानक मिळते मोठी संधी; ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात येऊ शकतो मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT