Golden Temple
Golden Temple Team eSakal
देश

सुवर्ण मंदिर विटंबना प्रकरणामागे मोठा कट; विश्वस्तांचा दावा

सुधीर काकडे

सुवर्ण मंदिराच्या (Golden Temple) कथित विटंबनाच्या प्रयत्नामागे मोठा कट होता असा दावा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (SGPC) अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी (Harjinder Singh Dhami) यांनी केला आहे. 'घटनेमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीने "कमांडो प्रशिक्षण" घेतलं आहे. कायद्याने स्वसंरक्षणार्थ एखाद्याला मारण्याची मुभा दिली आहे. त्यातूनच विटंबनेच्या प्रयत्नानंतर जमावाने त्या व्यक्तीची हत्या केली असावी असं मत धामी यांनी व्यक्त केलं.

सुवर्ण मंदिराच्या विटंबनेमागे मोठा कट असल्याची जाणीव झाल्यावर, SGPC टास्क फोर्सने त्या व्यक्तीला सुवर्ण मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखलं होतं. परंतु टास्क फोर्सच्या सदस्यांनी संध्याकाळी त्यांची ड्युटी बदलल्यानंतर गर्भगृहात प्रवेश करण्यात यशस्वी झाला अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. धामी म्हणाले, “त्याने ज्या प्रकारे रेलिंगवरून उडी मारली आणि अवघ्या सहा सेकंदात धार्मिक स्थळाला अपवित्र करण्याचा प्रयत्न यशस्वी केला, त्यावरून मला वाटतं की त्याने कमांडो प्रशिक्षण घेतलं असावं. यामागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. तसंच यामागे नेमकं काय षडयंत्र आहे हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू.

दरम्यान, एसजीपीसी टास्क फोर्सने पकडल्यावर जमावाने त्याला का मारले असे विचारले असता धामी म्हणाले की, “या घटनेमुळे भाविक खूप संतापले होते. कारण त्या व्यक्तीने तलवार उगारली आणि तो थेट पवित्र गुरु ग्रंथ साहिबवर हल्ला करणार होता." तसेच पुढे ते म्हणाले की, एखाद्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला झाल्यास तो स्वसंरक्षणार्थ समोरील व्यक्तीवर हल्ला करू शकतो. कायद्यानं तो गुन्हा नाही, असंही ते म्हणाले. कर्मचाऱ्यांनी काही करावं त्यापूर्वीच संतप्त जमावाने त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT