Shaktikant-Das 
देश

शक्तिकांत दासच RBIचे गव्हर्नर; कॅबिनेटने तीन वर्षांसाठी वाढवला कार्यकाळ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ वाढवण्यास मान्यता दिली आहे. त्यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2021 पर्यंत होता. तो आता आणखी तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे. शक्तीकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25 वे गव्हर्नर आहेत. त्यांनी 11 डिसेंबर 2018 रोजी गव्हर्नर पदाचा पदभार हाती घेतला होता. ते आता पुढील तीन वर्षे किंवा पुढील आदेशापर्यंत पदावर राहणार आहेत.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 10.12.2021 नंतर किंवा पुढील आदेश येईपर्यंत तीन वर्षांच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून शक्तीकांत दास यांची पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे, असं अधिकृत पत्रकात सांगण्यात आलं आहे. काल गुरुवारी उशीरा रात्री हा पुनर्नियुक्तीचा आदेश देण्यात आला. दास हे यापूर्वी अर्थ मंत्रालयात आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव होते आणि त्यांची 11 डिसेंबर 2018 रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँकेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

शक्तिकांत दास यांना शासनाच्या विविध क्षेत्रांतील कामांचा मोठा अनुभव आहे आणि त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वित्त, कर आकारणी, उद्योग, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर आहेत.

भारत सरकारच्या अर्थमंत्रालयातील त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये ते तब्बल 8 केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याशी थेट संबंधित होते. दास यांनी जागतिक बँक, आशियाई विकास बँक (ADB), न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) मध्ये भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणूनही काम केले आहे. त्यांनी IMF, G20, BRICS, SAARC इत्यादी आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT