rahul gandhi Pm Modi 
देश

'स्मशान आणि कब्रस्तान...'; राहुल गांधींचं टीकास्त्र

काँग्रेसचे खासदार आणि नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकस्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशात दिवसेंदिवस कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आधिकच वाढत आहे. मागील तीन दिवसांपासून तर नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त आढळत आहे. इतकेच नव्हे तर 15 दिवसांत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचीही संख्या तिपटीनं वाढली आहे. देशात काही ठिकाणी कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे स्मशानात मृतदेहांवर अंतिमसंस्कार करण्यासाठी वाट पाहावी लागतेय. यावरुनच काँग्रेसचे खासदार आणि नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकस्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांचं ट्विट -

'स्मशान आणि कब्रस्तान दोन्ही... जे म्हटलं ते करुन दाखवलं', असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. त्याचबरोबर #ModiMadeDisaster हा हॅशटॅगही वापरला आहे. या ट्वीटनंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कमेंट्समध्ये एकमेकांवर टीका करताना दिसतायेत.

ट्विट करत प्रियंका गांधी यांनीही सुनावलं-

'थक्क करणारी गोष्ट म्हणजे, भारतात करोना संक्रमणाचा प्रभाव वाढत असताना, गेल्या ७० वर्षांतील सरकारची मेहनत पाण्यात घालत एकेकाळचा लस 'निर्यातक' देश आता लसीची आयात करणारा देश बनला आहे. नरेंद्र मोदी हे असे पाटलट आहेत ज्यांनी आपात्कालीन परिस्थितीतून सहजगत्या बाहेर पडण्यासाठी केवळ बोर्डिंग पासवर आपला फोटो लावलाय.'

भारतामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मागील तीन दिवसांपासून देशात दोन लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मागील 24 तासांत 2 लाख 34 हजार 692 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर 1 हजार 341 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

Numerology : 'या' 5 मूलांकाचे लोक असतात सगळ्यांत जास्त निगरगट्ट; त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा शेवटी तुम्हाला देतात धोका

Helmet Expiry Check: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? घरबसल्या ‘या’ ट्रिक्सने लगेच करा चेक

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

महाराष्ट्राचे पोलिस आरोपीला पकडायला यूपीमध्ये पोहोचले, लोकांनी त्यांनाच चोर समजून चोपले; एका गोष्टीमुळे झाली गडबड

SCROLL FOR NEXT