Sharad Pawar esakal
देश

Sharad Pawar: "ज्याप्रकारे अरविंद केजरीवालांना अटक केली..."; इंडिया आघाडीच्या लोकतंत्र वाचवा रॅलीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य!

Sharad Pawar: इंडिया आघाडी आघाडीने आज दिल्लीत महासभा घेतली. या सभेत विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Sandip Kapde

Sharad Pawar: दिल्लीत इंडिया आघाडीच्या सभेसाठी विरोधक एकवटले आहेत. विरोधकांनी आज लोकतंत्र वाचवा रॅली काढली. या रॅलीत देशभरातून नेते सहभागी झाली होते. महाराष्ट्रातून शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी देखील सभेला संबोधित केले. यावेळ शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

शरद पवार भारत म्हणाले, “...या सरकारने (केंद्र सरकारने) ज्याप्रकारे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे आणि इतर अनेक राज्यांतील नेत्यांनाही तुरुंगात टाकले आहे. ही कृती म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. त्यामुळे संविधान वाचवण्याची जबाबदारी आपली आहे"

अबकारी धोरणाशी संबंधित एका प्रकरणात अरविंद केजरीवाल अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत. त्यामुळे विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील भाजपवर टीका केली. सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत. अंपायरवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन, कर्णधाराला धमकावून सामना जिंकला जातो, त्याला क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग म्हणतात. देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंच म्हणून कोणाची निवड केली. सामना सुरू होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करून आत टाकण्यात आले. मोदी या निवडणुकीत मॅच फिक्सिंग करत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

अरविंद केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनीही मंचावरून अरविंद केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखवला.  "माझ्या प्रिय भारतीयांनो, तुरुंगातून तुमच्या भावाच्या शुभेच्छा स्वीकारा. मी तुमच्याकडून मते मागत नाही. मी 140 कोटी भारतीयांना नवीन भारत घडवण्यासाठी आमंत्रित करतो. भारत हा एक महान देश आहे, त्याची महान संस्कृती आहे. आपले लोक अशिक्षित का आहेत, ते गरीब का आहेत? मी तुरुंगात आहे, इथे मला विचार करण्याची संधी मिळते," असे केजरीवाल म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT