modi-pawar-1.jpg 
देश

शरद पवार कोरोना संक्रमित कळताच PM मोदींना काळजी; लगेच केला फोन!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शरद पवार यांनी याबाबतची माहिती आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे. ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं कळताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागलीच शरद पवार यांना फोन करत त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली आहे. याबाबतची माहिती देखील शरद पवार यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.

शरद पवार यांनी माझी चाचणी पॉझीटीव्ह आल्याचं सांगितंलय मात्र, काळजीचं काही कारण नसल्यांच त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनंही त्यांनी केलं आहे. (Sharad Pawar Tested Corona Positive) पुढे त्यांनी ट्विट करत सांगितलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. त्याच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, साधारण महिन्याभरापूर्वी २९ डिसेंबर २०२१ रोजी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुलगाममध्येही 'पहलगाम पॅटर्न'? धर्म विचारून मजुरांची हत्या? तपास सुरू

Revenue Camp: थेऊर समाधान शिबिरात ग्रामीण भागात महसूल दिन साजरा; जिल्हाधिकाऱ्यांची पाणंद रस्त्यांसाठी भरीव निधीची घोषणा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांचा धाक संपला, गुंडांचा बंदोबस्त करा; अन्यथा...; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा

Pune Haveli Infrastructure Update: हडपसर–यवत, विमाननगर–शिरूर उन्नत मार्गामुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी अंतर्गत रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव; आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा पुढाकार

Fishing Rules: राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! खोल समुद्रातील मासेमारी पुन्हा सुरू, पण निर्बंध कायम; सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT