Sharad Pawar_Supreme Court 
देश

Sharad Pawar: शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात धाव; निवडणूक आयोगाच्या निकालाला दिलं आव्हान

निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत नुकताच निर्णय दिला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अयोग्य आहे, त्यामुळं या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. (sharad pawar faction run to supreme court aganist election commission decision about ncp)

निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत नुकताच निर्णय दिला. त्यानुसार, पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्या गटाला देण्यात आलं. त्यामुळं शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला होता. आयोगानं दिलेला निर्णय हा चुकीचा असल्याचा दावा करत शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात दोन दिवसांपूर्वीच धाव घेतली आहे. (Marathi Tajya Batmya)

यासाठी पुरावे म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तब्बल 800 पानांची कागदपत्र शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात दाखल केली आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल

दरम्यान, निवडणूक आयोगानं निकाल दिल्यानंतर शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात येईल आणि त्यावर तातडीनं सुनावणी होऊ शकते ही शक्यता लक्षात घेत अजित पवार गटाकडून त्याच दिवशी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केली होती. त्यामुळं जर शरद पवारांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं निर्णय देताना आपलीही बाजून ऐकून घेतली जावी असं या कॅव्हेटमध्ये अजित पवार गटानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT