देश

Sharad Pawar : शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे अन् राहुल गांधींमध्ये बंद दाराआड खलबतं; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि नावासंदर्भात शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली. स्वतः शरद पवार हे आयोगाच्या कार्यालयात सुनावणीसाठी हजर होते. या सुनावणीपूर्वी शरद पवार हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी गेले होते. तिथे राहुल गांधी आणि पवार-खर्गे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू होण्याच्या काही तास आधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसपुढील निवडणूक चिन्हाचे संकट व ‘इंडिया’ आघाडीच्या पुढील वाटचालीवर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या प्रश्नाची सुनावणी पुढच्या सोमवारी होणार आहे. यात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह शरद पवार गटाने गमावल्यास पुढील रणनीती काय असावी, यावर प्रामुख्याने यावेळी चर्चा झाल्याचे समजते. ही बैठक पूर्वनियोजित नव्हती. परंतु शुक्रवारी अचानक दुपारी दोन वाजता शरद पवार हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटणार असल्याचे स्पष्ट झाले. या बैठकीत राहुल गांधी यांनी हजेरी लावली. ‘इंडिया’ आघाडीतील या तीन नेत्यांनी एकत्रितपणे चर्चा केली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीनंतर या नेत्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले.

‘इंडिया’ आघाडीची सर्व नेत्यांसह एकत्रित जाहीर सभा घेण्यावर सुद्धा चर्चा झाल्याचे समजते. जागावाटपाच्या संदर्भात असलेल्या समन्वय समितीमध्ये शरद पवार आहेत. या समितीची पहिली बैठक झाल्यानंतर पुढील बैठक झालेली नाही. त्याचप्रमाणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणारी ही जाहीर सभा अद्यापही झालेली नाही त्यामुळे ही सभा होणार की नाही, असा संशयही व्यक्त केला जात आहे. या मुद्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: अज्जू रडवलंस यार..! अजिंक्य रहाणे निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना रडला, Video Viral

Ajinkya Rahane Retirement: भारतीय क्रिकेटला मोठा धक्का; माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Viral Video : "बहि‍णींची काळजी घे, आईला दुखवू नकोस..." मृत्यूच्या दारात असलेल्या वडिलांचा चिमुकल्याला शेवटचा संदेश, व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Latest Marathi News Live Update : २४ कॅरेट सोनं ८,२०० रुपयांनी महाग, चांदीचे दर स्थिर

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेच्या कारवाईला FDA कर्मचारी वैतागले, थेट मंत्र्यांकडेच तक्रार; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT