sharad pawar ncp with all opposition parties may join BJP NDPP alliance govt in Nagaland political news  
देश

Nagaland Politics : लोकशाहीची हत्या? राष्ट्रवादीच नाही, सगळेच विरोधक भाजपसोबत सत्तेत जाण्याची चर्चा

सकाळ डिजिटल टीम

नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आलेले आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादी हा नागालँडमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. इतकेच नाही तर नागालँडमध्ये सर्वच्या सर्वच विरोधी पक्ष सत्तेत सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.

नागालँड मध्ये विधानसभेच्या ६० जागा आहेत, येथे भाजप आणि एनडीपीपी या दोन पक्षांनी स्पष्ट बहुमत सत्ता स्थापन केली आहे. या आघाडीला साठ पैकी ३७ जागा मिळाल्या आहेत. यादरम्यान तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष राष्ट्रवादी काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागालँडमध्ये पुर्णपणे सर्वपक्षिय सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. येथे एकही पक्ष विरोधात बसायला तयार नसून सर्वच विरोधी पक्ष हे सत्तेत सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.

हे यापूर्वीही झालंय

नागालँडमध्ये २०१५ पासून हे घडत आले आहे. मात्र या वेळी विजेत्या पक्षांचा शपथविधी होण्याच्या आगोदरपासूनच विरोधकांनी सत्तेत सहभागी होण्याचा सूर आळवणे सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे नेते देखील इच्छूक असल्याची माहिती समोर आली होती.

राष्ट्रवादीचे नेते आग्रही

नागालँड सरकारचा शपथविधी सोहळा काल पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नागालँडचे राज्यपाल ला गणेशन, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे शपथ ग्रहण सोहळ्याला उपस्थित होते.

नागालँडमध्ये गतवेळीही देखील विरोधी पक्ष नव्हता, येथे सर्वपक्षीय सरकार होतं. यावेळीह तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा विचार आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.

भाजपसोबत जाण्यावरुन नागालँडमधील स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. सध्या नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप आघाडीला पूर्ण बहुमत आहे. तरीही सत्तेत सहभागी होण्याचा राष्ट्रवादीच्या सात आमदारांचा आग्रह असल्याचे बोलले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT