Sharad Pawar on Lok Sabha Election Result Esakal
देश

Sharad Pawar: विजयी पत्रकार परिषदेत शरद पवारांनी अजित पवारांचा विषय एका वाक्यात संपवला; म्हणाले...

Sharad Pawar on Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अजित पवारांचे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी एक उमेदवार विजयी झाला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून भाजपला बहुमत मिळालं नसलं तरी एनडीए सरकार स्थापनेच्या स्थितीत आहेत. राज्यात इंडिया आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत तर एनडीएने १७ जागांवर यश मिळवलं आहे. ज्या अजित पवारांनी शरद पवारांना सोडचिठ्ठी देत भाजपसोबत घरोबा केला त्या अजित पवारांना मतदारांनी साथ दिली नाही. अजित पवारांचे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी एक उमेदवार विजयी झाला आहे. तर शरद पवारांच्या १० उमेदवारांपैकी ८ उमेदवार विजयी झाले आहेत. या बाबत आज पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न केला असता त्यांनी एका ओळीत उत्तर दिलं आहे.

चिन्ह गेलं पक्ष गेला, मात्र अजित पवार यांचा फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त झालं असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय अजित पवारांना काय मिळालं, या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, अजित पवार यांची स्थिती काय याबद्दल मला काही माहीत नाही, ते प्रश्न त्यांना विचारा. माझं त्याच्याविषयी काहीही भाष्य करण्याचं कारण नाही, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

शरद पवारांनी सांगितलं विजयाचं कारण

लोकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्याबाबत नाराजी होती. तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात बरोजगारी वाढली होती. शिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित होते, त्यामुळे राज्यात भाजपला अपयश आलं आहे, असं शरद पवार म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा झाला याबाबत मला माहिती नाही अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

आमच्या बैठकीत जी रणनीती ठरेल त्यातून आम्ही पुढे जाऊ. मी कोणाशीही बोललो नाही. अजित पवार यांच्याबद्दल मला माहित नाही. निकालानंतर आमची पहिली मीटिंग आहे. यात रणनीती ठरवली जाईल. जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत चर्चा करणं योग्य नाही. उद्धव ठाकरे आज बैठकीला येत आहेत. उत्तर प्रदेशातील स्थितीबाबत मला माहिती नाही. पण महाराष्ट्रातील लोकांमधे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाराजी होती, त्याची ही रिअँक्शन आहे असं मला वाटतं, असंही ते म्हणाले.

इंडिया आघाडीच्या बैठकीला कोण-कोण येणार आहे याची माहिती नाही. पण, पुढील रणनीती काय असेल हे बैठकीमध्ये ठरवण्यात येईल. त्यानंतर आज रात्री याबाबत माहिती दिली जाईल, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT