shashi tharoor
shashi tharoor 
देश

'शशी थरुर तर लव्ह गुरु...'

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी व्हॅलेंटाइन डे वर ट्विट केल्यानंतर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी प्रत्युत्तर देताना शशी थरूर तर लव्ह गुरू आहेत, त्यामुळे ते विरोधकांवर चिडणारच असे म्हटले आहे.

शशी थरूर यांनी ट्विटवर म्हटले आहे की, 'व्हॅलेंटाइन डे निमित्त शुभेच्छा देताना जर संघ परिवाराने तुम्हाला ट्रोल केले किंवा मित्र- मैत्रिणीसोबत बाहेर फिरु नका अशी धमकी दिल्यास त्यांना सांगा तुम्ही भारताचा पारंपारिक कामदेव दिवस साजरा करीत आहात.' असे ट्विट शशी थरुर यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटवरुन नक्वी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

थरूर यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे की, 'शशी थरूर यांनी केलेली टीका आम्ही समजू शकतो कारण ते स्वतः लव्ह गुरु आहेत. त्यामुळे आता जर कोणी व्हॅलेंटाईन डे ला विरोध केला तर लव्ह गुरु तर त्याचा विरोध करणारच ना.'

दरम्यान, 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम दिवस म्हणून जगभरात साजरा केला जात आहे. मात्र, हा पाश्चिमात्य संस्कृतीचा सण असल्याचे सांगत त्याला भारतातील काही कडव्या हिंदूत्ववादी संघटनांनी विरोध करीत आहेत. विरोध करताना यामुळे भारतीय संस्कृती बिघडत असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT