Shashi Tharoor and Priyanka Chaturvedi Team eSakal
देश

संसद टीव्हीवर शशी थरुर, प्रियंका चतुर्वेदी करणार सूत्रसंचालन

शशी थरुर आणि शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी एका चॅट शोसाठी सूत्रसंचालन करणार आहेत.

सुधीर काकडे

लोकसभ टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही मिळून तयार करण्यात आलेल्या संसद टीव्हीवर काँग्रेस नेते शशी थरुर आणि शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी एका चॅट शोसाठी सूत्रसंचालन करणार आहेत. बुधवारी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या संयुक्तविद्यमानाने या चॅनलची सुरुवात करण्यात आली आहे.

संसद टीव्ही लवकरच एक मालिका सुरु करणार असून, या मालिकेत आजी-माजी खासदार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शशी थरुर आमि प्रियंका चतुर्वेदी या दोघांपासून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. शशि थरुर 'टू द पॉंइंट' या कार्यक्रमात प्रतिष्ठीत मंडळींची मुलाखत घेताना दिसु शकतात. तर मेरी कहानी या कार्यक्रमात महिला खासदारांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी चतुर्वेदी यांच्यावर असणार आहे.

संसद टीव्हीवर सुरु होणाऱ्या या मालिकेत सध्या तरी राजकीय मंडळींना स्थान नसून, सुरुवातीच्या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असू शकतो. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचा ‘ट्रांसफॉर्मिंग इंडिया’ कार्यक्रमात भारताच्या विकासी कहानी बद्दल चर्चा करताना दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Election Candidates : गोकुळमधील महायुतीच्या उमेदवार यादीत, कोणाचा मुलगा, भाऊ तर कोणाची पत्नी; २५ उमेदवारांच्या यादीत ९० टक्के घराणेशाहीचे वर्चस्व

ट्रम्प प्रशासनाचा भारतीय आयटी कंपन्यांना मोठा दणका! Infosys, TCS, Wiproसह आठ कंपन्यांवर निर्बंध, नेमकं काय बदलणार?

Nana Patekar: दुष्काळी परिस्थितीत आम्हाला का सोडून गेलात हो?’ नाना पाटेकरांच्या आठवणीने नांदेडचे शेतकरी गहिवरले

Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत महायुतीत १२ माजी संचालकांना संधी; ११ नवे चेहरे, तीन माजी अध्यक्ष रिंगणात; करवीरमध्‍ये सर्वाधिक उमेदवार

SHAH RUKH KHAN: ‘किंग’मध्ये शाहरुखसोबत करीना कपूरही थिरकणार? खास गाण्यासाठी निर्मात्यांची मोठी तयारी, आंतरराष्ट्रीय गायकांचीही होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT