Shashi Tharoor Viral Photo
Shashi Tharoor Viral Photo e sakal
देश

शशी थरूर यांनी चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलंय? दिलं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : लेखक वैभव विशालने शुक्रवारी ट्विटरवर एक फोटो शेअर करत यामधील बाल कलाकार काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) असल्याचा दावा केला होता. त्यानंतर शशी थरुर यांनी देखील ते गुपित ठेवण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं. त्यामुळे शशी थरुर हे या चित्रातील बालकलाकार असावे, असा विश्वास नेटकऱ्यांना बसला. त्यानंतर थरूर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अंदाज अपना अपनामध्ये शशी थरूर कधीच नव्हते. पण, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे. त्यांचे स्क्रीन नाव मास्टर ग्यान होते. त्यांनी 9 हिंदी आणि मल्याळम चित्रपट केले, असं ट्विट वैभव यांनी केलं. गीता बालीसोबतचा एक फोटो शेअर केला. यावर शशी थरूर यांनी लिहिलं की मी हे गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मी अजूनही मास्टर ग्यान म्हणून ओळखला जातो. सोशल मीडिया युजर्सने हा चित्रपट १९५८ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्यावेळी शशी थरूर फक्त दोन वर्षांचे होते, असं म्हटलं होतं. तर एका युजरने हा फोटो १९५४ च्या चित्रपटातील असून हा बालकलाकार बाबू असल्याचं म्हटलं होतं.

काही युजरला या चित्रपटातील बालकलाकार शशी थरूर आहेत, असा विश्वास बसला. त्यानंतर शशी थरूर यांनी आज स्पष्टीकरण दिले. हा फक्त एक विनोद होता आणि मस्करी म्हणून त्यांनी तसं ट्विट केलं होतं, असं थरूर म्हणाले.

दरम्यान, इंटरनेटवर असा दावा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सलमान खान आणि आमिर खान यांच्या अंदाज अपना अपना या सिनेमातील बसच्या सीनमध्ये त्यांच्या मागे बसलेला माणूस शशी थरूर आहेत, असा दावा केला जातो. हे खरे आहे की शशी थरूर हे सलमान खानच्या जवळचे आहेत. त्यांना एकदा सलमान खानची भूमिका असलेल्या चित्रपटात काम करण्यासाठी एक दिग्दर्शकाने संपर्क साधला होता. याबाबत स्वतः थरूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT