shashi tharoor shashi tharoor
देश

पाकिस्तानच्या राजकीय संकटावर शशी थरूरांनी व्यक्त केले मत, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तान विधानसभेच्या अध्यक्षांनी मतदान करू दिले नाही. राष्ट्रपतींनी विधानसभा विसर्जित केली. मला वाटतं पाकिस्तानात असं कधीच घडलं नव्हतं. पाकिस्तानात पंतप्रधानपदी कोणीही बसेल तरी देश लष्करच चालवेल, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी सोमवारी लगावला.

काळजीवाहू पंतप्रधानांची नियुक्ती होईपर्यंत इम्रान खान देशाचे पंतप्रधान म्हणून कायम राहतील. काळजीवाहू पंतप्रधानांची नियुक्ती होईपर्यंत निवर्तमान पंतप्रधान पदावर राहतील, असे या अधिसूचनेत पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी सोमवारी म्हटले. पाकिस्तानात मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोड सुरू आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार पडते की काय? अशीच स्‍थिती होती. अशात पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय संकटाची शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी खिल्ली उडवली.

यापूर्वी कॅबिनेट सचिवालयाने अधिसूचना जारी केली होती की, इम्रान खान तात्काळ पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान पद सोडतील. तथापि, घटनेच्या कलम ९४ अन्वये राष्ट्रपती बाहेर जाणाऱ्या पंतप्रधानांना त्यांचा उत्तराधिकारी पंतप्रधान म्हणून कार्यभार घेईपर्यंत पदावर राहण्यास सांगू शकतात. पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांच्या सूचनेनुसार राष्ट्रपती अल्वी यांनी नॅशनल असेंब्ली विसर्जित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT