Tharur_Moitra 
देश

महुआ मोईत्रांना शशी थरुरांचा पाठिंबा; म्हणाले, धर्म कोणी...

महुआ मोईत्राच्या समर्थनार्थ शशी थरुर आले पुढे. हा वाद काय आहे नक्की जाणून घ्या...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : 'काली' या माहितीपटावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यावर केलेल्या टिपण्णीमुळं देशात वादळ निर्माण झालं आहे. भोपाळमध्ये मोईत्रा यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी मोईत्रा यांची पाठराखण केली असून यावर आपलं मतंही प्रदर्शित केलं आहे.

थरुर यांनी सलग दोन ट्वीट केले आहेत. यामध्ये ते म्हणतात, "महुआ मोईत्रा यांच्यावर होत असलेल्या टीकात्मक हल्ल्यांनी मला आश्चर्य वाटत आहे. हे हल्ले कशामुळं होतं आहेत ते सर्व हिंदुंना माहिती आहे. हिंदूंना माहिती आहे की, देशात विविध ठिकाणी विविध प्रकारे पूजाअर्चा करण्याची पद्धत आहे. देवीला कोण काय अर्पण करतं ते भक्तच जाणत असतो"

सध्या आपण अशा काळात आहोत जिथं सार्वजनिक व्यासपीठावर आपण कोणाबद्दल काही बाललो तर कोणाच्या ना कोणाच्या भावना दुखावतील. पण हे खरंय की, महुआ यांनी कोणाला अपमानित करण्याच्या हेतूनं असं म्हटलेलं नाही. मी सर्वांना अपिल करतो की, वातावरण थंड ठेवा. धर्म कोणी कशा प्रकारे मानायचा ते त्या भक्तावर सोडून द्या, असंही थरुर यांनी म्हटलं आहे.

मी कालीभक्त, कोणाला घाबरत नाही - मोईत्रा

यापूर्वी खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, "मी काली मातेची पूजा करते. मी कालीभक्त असून मी कोणालाही घाबरत नाही. भाजप हल्ले करतंय पण मी तुम्हाला घाबरत नाही. पोलिासांना, गुंडांना किंवा तुमच्या ट्रोलर्सनाही मी घाबरत नाही.

काय म्हणाल्या होत्या मोईत्रा?

एका चर्चेदरम्यान खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या होत्या की, "हे तुमच्यावर अबलंबून आहे की, तुम्ही तुमच्या देवाला कसं पाहता. जर तुम्ही भूतान आणि सिक्कीममध्ये गेलात तर तिथं पुजेमध्ये देवाला दारु अर्पण केली जाते. पण जर उत्तर प्रदेशात प्रसादामध्ये दारु वाटली तर कोणाच्या भावना दुखावू शकतात. माझ्यासाठी काली देवी ही एक मांस खाणारी आणि मद्य पिणाऱ्या देवीच्या रुपात आहे. कालीमातेची अनेक रुप आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT