Shehla Rashid 
देश

शेहला रशीदचे आरोप निराधार; भारतीय लष्कराचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवरून जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीद हिने भारतीय लष्करावर केलेले आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण लष्कराकडून देण्यात आले आहे. भारतीय लष्करावर आरोप केल्याने ट्विटरवर #arrestShehlaRashid हा ट्रेंड सुरु आहे.

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर सरकारकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. येथील इंटरनेट व दूरध्वनी सेवा बंद आहेत. मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात आहेत. यावरून शेहला रशीदने ट्विट करत भारतीय लष्करावर आरोप केले आहेत. भारतीय लष्कराचे जवान काश्मीरमधील नागरिकांच्या घरांमध्ये जबरदस्तीने घुसून युवकांना ताब्यात घेत आहे, तसेच त्यांच्या घरात तोडफोडही करत आहे. जवान मुद्दाम रेशन फरशीवर फेकून देत आहेत आणि तांदळामध्ये तेल टाकून देत आहेत. 

शेहलाचे हे सर्व आरोप निराधार असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. तेथील परिस्थितीचा आढावा न घेता लष्करावर हे चुकीचे आरोप करण्यात येत आहेत, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शेहलाने रविवारी काश्मीरमधील परिस्थितीवर सलग 10 ट्विट केले होते. शेहलाच्या आरोपांवरून ट्विटरवर तिला अटक करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT