मामल्लपुरम - चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी शिखर परिषद मामल्लपुरम येथे होत असून, या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज लावताना कार्यकर्ते. 
देश

जिनपिंग उद्या भारतात

सकाळ न्यूज नेटवर्क

चेन्नईमध्ये नरेंद्र मोदींशी होणार अनौपचारिक चर्चा
नवी दिल्ली - चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग शुक्रवारी (ता. ११) भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत त्यांची चेन्नईत अनौपचारिक बैठक होईल. वुहान येथे दोन्ही नेत्यांची एप्रिल २०१८ मध्ये अनौपचारिक बैठक झाली होती. त्याच मालिकेतील ही दुसरी बैठक आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आज निवेदन जारी करून दोन्ही नेत्यांच्या ‘शिखर भेटीची’ घोषणा केली. चेन्नईनजीक मामल्लापुरम येथे ही भेट होईल.

यादरम्यान दोन्ही नेते द्विपक्षीय, प्रादेशिक तसेच जागतिक महत्त्वाच्या मुद्यांवर, भारत आणि चीनची वाढती भागीदारी, विविध क्षेत्रांतील परस्पर सहकार्य आदी विषयांवर चर्चा करतील. भारतीय पंतप्रधानांच्या निमंत्रणानुसार हा दौरा होत असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात नमूद केले आहे. अर्थात, या वेळी दोन्ही देशांदरम्यान कोणतेही करारमदार होणार नाहीत. 

मागील वर्षी वुहान येथील अनौपचारिक बैठकीची घोषणा पाच दिवसांपूर्वीच झाली होती. डोकलामप्रकरणात चीनचा आडमुठेपणा आणि भारताने घेतलेली कणखर भूमिका यामुळे दोन्ही देशांमध्ये तब्बल दोन महिन्यांहून अधिककाळ चाललेला तणाव निवळण्यात वुहान बैठक महत्त्वपूर्ण ठरली होती.  या पार्श्‍वभूमीवर चिनी राष्ट्राध्यक्षांच्या यंदाच्या भारत दौऱ्याबद्दल चीनकडून काहीही कळविण्यात आले नसल्याने अनिश्‍चिततेचे वातावरण होते. परराष्ट्र मंत्रालयाने देखील या दौऱ्याबाबत बोलणे टाळले होते. चीनकडून होकार आल्यानंतर ही घोषणा झाली आहे. 

प्रस्तावित भेटीच्या काही आठवडे आधी पूर्वेकडील सीमेवर भारतीय लष्कराचा ‘ऑपरेशन हिमविजय’ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धसराव, त्याचप्रमाणे लडाख तसेच अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एम-७७७ हॉवित्झर तोफा तैनात करण्याचा निर्णय, यातून भारताने दिलेला कणखरतेचा दिलेला संदेश चिनी अस्वस्थतेचे कारण मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT