Shimla landslide on shiv temple today Update 5 dead many feared trapped Under debris NDRF relief work underway  
देश

Landslide : श्रावण सोमवारनिमीत्त दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांवर काळाचा घाला! मंदिरावर दरड कोसळून ५ ठार, अनेक अडकले

रोहित कणसे

Shimla landslide on shiv temple today : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे एक मोठी दुर्घटना घडली. सोमवारी सकाळी सात वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे शिव बावडी येथील मंदिरावर दरड कोसळली. त्यामुळे मंदिरात उपस्थित २५ हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. आतापर्यंत २ मुलांसह ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच उर्वरितांचा शोध सुरू आहे.

हे मंदिर शिमलाच्या उपनगरीय भागतील बालूगंज भागात समरहिलवर आहे. श्रावण सोमवारमुळे मंदिरात सकाळपासूनच गर्दी होती.

पावसामुळे बचावकाऱ्यात अडचण

मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. डोंगरावरून अजूनही दगड पडत आहेत. ढिगाऱ्यासह मंदिराच्या वरती चार ते पाच झाडे उन्मळून पडली आहेत.यामुळे जास्त नुकसान झाले आहे. एनडीआरएफची टीम बचावकार्य करत आङे

सीएम सुखविंदर सिंग यांची घटनास्थळीला

हिमाचलचे मुख्यमंत्री सुकविंदर सिंग यांनी सांगितले की, आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने सर्व जण दर्शनासाठी आले होते. २० ते २५ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत की, सेना, पोलिस आणि एनडीआरएफच्या मदतीने लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT