Thackeray Vs Shinde  Esakal
देश

ShindeVsThackeray: ठाकरे गटाला धक्का! प्रकरण ७ सदस्यीय खडपीठापुढं जाणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 'या' दिवशी होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टानं आज एका मुद्द्यावर निकाल दिला. यामध्ये सात सदस्यीय खडंपीठाकडं या प्रकरणाची सुनावणी व्हावी, ही ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. तसेच या खटल्यातील मेरिटनुसार यावर निर्णय घेतला जाणार आहे, त्यामुळं ठाकरे गटाची निराशा झाली आहे. त्यामुळं तुर्तास हे प्रकरण आता सात सदस्यीय खंडपीठासमोर जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर आता पुढील सुनावणी २१ आणि २२ फेब्रुवारीला होणार आहे.

सुप्रीम कोर्टानं नेमका निकाल काय दिला?

सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं एक पानी निकाल वाचताना सांगितलं की, नबाम रेबिया प्रकरणाचा निकाल तपासण्यासाठी मोठ्या खंडपीठाकडं अर्थात ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडं हे प्रकरण पाठवायचं की नाही हे या खटल्याच्या मेरिट्सवर ठरवलं जाईल. याची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होईल.

पुढील सुनावणीत काय होणार?

पुढील सुनावणीत आता इतर मुद्द्यांवरील याचिकांवरही सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी होणार आहे. ही सुनावणी ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडेच होणार आहे. यामध्ये नबाम रेबिया प्रकरणाव्यतिरिक्त इतर मुद्देही घटनापीठ ऐकणार आहे. तीन दिवस झालेल्या युक्तीवादामध्ये नबाम रेबिया प्रकरणावरच प्रामुख्यानं चर्चा झाली. त्यानंतर काल आणखी काही मुद्दे समोर आले होते. त्यामुळं वेळ पुरेसा नसल्याचं सांगत खंडपीठानं याची आणखी सुनावणी होणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडं द्यायचं का यावर निकाल दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closed: 31 मार्चला शेअर बाजार बंद? ट्रेडिंग होणार की नाही? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी

होर्मुझ उघडा नाहीतर खार्ग उडवू, तेल विहिरी पेटवू! ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, इराणचं पिण्याचं पाणीही धोक्यात?

यंदाची हनुमान जयंती 'या' राशींना फळणार ! 1 एप्रिलपासून नशीब बदलणार; पैसाच पैसा आणि भरपूर यश

Akola Civic Row: ‘पन्नास खोके’ घोषणांवरून अकोला महापालिकेत गोंधळ; महापौरांचा १६ विरोधी नगरसेवकांना तीन सभांसाठी निलंबनाचा निर्णय

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांवरून वाद चिघळला, रहिवासी आणि प्राणीमित्रांतील वाद विकोपाला; विरोधी गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT