Shirdi Darshan esakal
देश

Shirdi Darshan : शिर्डी दर्शनासाठी VIP पास कसा मिळवाल? जाणून घ्या सविस्तर

आज आपण शिर्दी दर्शनासाठीची संपूर्ण माहिती प्रदान करणाऱ्या शिर्दी ट्रस्टच्या ऑनलाइन साइट आणि त्यावर VIP पास कसा मिळवायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया

साक्षी राऊत

Shirdi Darshan : शिर्डीच्या साई मंदिरात साईबाबांचं प्रत्यक्ष दर्शन घडावं यासाठी वर्षभरच भक्तांची प्रचंड गर्दी असते. साईबाबांच्या दर्शनासाठी भक्त भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे येतात. याशिवाय दर्शनासाठी इथे तुम्हाला विदेशी भक्तही दिसून येतील.

मात्र अनेकांना शिर्दीच्या अधिकृत ऑनलाइन साइटबाबत माहिती नाही. तेव्हा आज आपण शिर्दी दर्शनासाठीची संपूर्ण माहिती प्रदान करणाऱ्या शिर्दी ट्रस्टच्या ऑनलाइन साइट आणि त्यावर VIP पास कसा मिळवायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

अधिकृत साइटवरून VIP पास कसा मिळवाल?

  • VIP पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम https://online.sai.org.in/#/login या साइटवर जा.

  • भक्त मोबाइल क्रमांक आणि ओटीपी/पासवर्ड किंवा ईमेल आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करू शकतात.

  • अकाउंट तयार करण्यासाठी वापरलेला एकच मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वेगवेगळ्या खात्यांसाठी वापरता येत नाही.

  • लॉग इन केल्यानंतर, भक्तांनी वयक्तिक माहिती - नाव, वय, आयडी प्रूफ बुकींग सेवांसाठी अपडेट करावा. (VIP)

  • फोटो आयडीपैकी कोणत्याही एकाची माहिती - आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/पॅन कार्ड/पासपोर्ट/राशन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स एंटर करावे जे सेवांचा लाभ घेताना शिर्डी येथे पडताळले जातील. (Shirdi)

  • इमेल आयडी माय प्रोफाईलमध्ये अपडेट केला पाहिजे, जर भक्त लॉग इन करू इच्छित असेल / ईमेलद्वारे संवाद साधायचा असेल तर ईमेल आयडी अनिवार्य आहे.

  • एकदा भक्ताने माय प्रोफाइलमध्ये ईमेल अपडेट केल्यानंतर, ईमेल व्हॅलीडेशनसाठी एक व्हॅलीडेशन लिंक पाठविली जाईल.

  • लॉगिन न करता, भक्त केवळ सेवांची उपलब्धता चेक करू शकतात.

  • ज्या भाविकांना मोबाईल/ओटीपी सेवांचा अॅक्सेस नाही ते रजिस्टरवर क्लिक करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT