Shivsena Symbol  
देश

ShivSena Symbol: शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमची! ठाकरेंनी आयोगासमोर टाकला मोठा डाव

शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही, असंही ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : शिवसेनेचं पक्षचिन्ह 'धनुष्यबाण' यावर कोणाचा हक्क आहे, यावर आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगापुढं सुनावणी सुरु आहे. यावेळी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या घटनेचा मुद्दा उपस्थित केला असून प्रतिनिधीसभा ठाकरेंकडेच असल्याचा दावा केला आहे. (Shiv Sena Symbol according to constitution representative assembly to be Thackeray group says Kapil Sibbal)

शिवसेनेच्या घटनेनुसार प्रतिनिधी सभा ठाकरे गटाची आहे, शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच नाही. पक्ष सोडून गेलेले लोक प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाहीत. त्यामुळं घटनेनुसार, प्रतिनिधी सभा ठाकरेंकडेच आहे आणि प्रतिनिधी सभाच पक्ष चालवते, असं आयोगाला सांगत अॅड. कपिल सिब्बल यांनी मोठा डाव टाकला आहे.

शिंदे गट राजकीय पक्ष नाही - सिब्बल

पक्षाच्या प्रतिनिधी सभेला हजेरी न लावता शिंदे गटाचे आमदार गुहावटीला का गेले? त्यांनी लोकशाहीनुसार आपलं म्हणणं मांडायला हवं होतं. राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाने कागदपत्रे सादर केली आहेत का? असा सवाल विचारत शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही, असंही यावेळी सिब्बल यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT