Madhya Pradesh Assembly Elections News 
देश

भाजपला मतदान केलं म्हणून दिराची महिलेला मारहाण...; शिवराज यांनी घेतली पीडितेची भेट

Sandip Kapde

Madhya Pradesh Assembly Elections News: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आहेत. आता मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा सुरु आहे. अनेक नेत्यांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपला मतदान केले म्हणून दिराने एका मुस्लिम महिलेला मारहाण केली आहे. या महिलेची शिवराज सिंह चौहान यांनी भेट घेतली.

शिवराज सिंह चौहान यांच्या गृहजिल्ह्यातील सिहोर येथील एका महिलेला भाजपला मत देणे आणि भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करणे महागात पडले. महिलेच्या दिराने भाजपला मत दिल्यावर आणि विजयाचा आनंद साजरा केल्यावर तिला इतका राग आला की त्याने तिला मारहाण केली.

यानंतर पीडित महिलेने न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि न्याय मिळावा यासाठी अर्ज सादर केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलिसांनी तिच्या दिराविरुद्ध कलम २९४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान समिना बी नावाची महिला आपल्या मुलांसह मुख्यमंत्री कार्यालयात गेली होती. शिवराज सिंह यांनी त्यांना बोलावले होते. सीहोर जिल्ह्यातील बरखेडा हसन गावातील एका मुस्लिम महिलेला भाजपला मतदान केल्याबद्दल मारहाण झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. यानंतर शिवराज यांनी समीना बी यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावून त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा केली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि सुरक्षिततेचे आणि सन्मानाचे आश्वासन दिले. (Latest Marathi News)

बैठकीनंतर शिवराज म्हणाले की, "मजबूत लोकशाहीसाठी भाजपला मतदान करण्यासाठी माझ्या एका बहिणीचा तिच्या कुटुंबाने छळ केल्याची बाब माझ्या निदर्शनास आली आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासोबतच पीडित बहिणीला संपूर्ण सुरक्षा आणि आर्थिक मदतही दिली जाणार आहे. मी तिला म्हणालो कि बहिण, तू कशाचीही काळजी करू नकोस, तुझा भाऊ नेहमी तुझ्या सोबत आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT