sanjay raut sanjay raut
देश

शाहांच्या पुणे दौऱ्यावर राऊतांची पहिली प्रतिक्रिया, 2014 मध्ये...

ओमकार वाबळे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकार मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राचा पहिला दौरा केला. यावेळी त्यांनी नगर आणि पुण्यात महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यात भाजपने सत्ता गमावल्यानंतर वैफल्यग्रस्त झाल्यामुळे अमित शहांनी हे वक्तव्य केल्याचं राऊत म्हणाले. अमित शहांचं वक्तव्य असत्याला धरून आहे आम्हाला अमित शाह पुण्यात जे बोलले, त्याची दया आली, आणि आश्चर्यही वाटलं, असं राऊत यांनी म्हटलं. (Sanjay Raut in Delhi)

संजय राऊत यांचे महत्वाचे मुद्दे

आमच्या सारख्या प्रखर हिंदुत्ववादी पक्षाला भाजपने 2014 साली सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. 2014 साली शिवसेनेला सत्तेपासून दूर करा, हे सांगणारे कोण होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हिंदुत्ववादाचा पावलो पावली विश्वासघात करणारे कोण. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कोणी कटकारस्थानं केली, असं राऊत म्हणाले. यावर बोला. पुण्यात जमत नसेल तर दिल्लीत बोला, असं आवाहन राऊत यांनी अमित शाहांना केलं आहे.

राऊत यांचे महत्वाचे मुद्दे

तीन तीन चिलखतं घालून तुम्ही महाराष्ट्रात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहात, तर ती काढून लढा... आम्ही छातीवर वार झेलतो..सीबीआय, ईडी यांसारख्यांच्या खांद्यावरून आमच्यावर गोळ्या झाडू नका.

वेगळे लढून दाखवा, आम्ही राजीनामा देऊ

2014 साली प्रचंड ताकद असून आम्ही चांगले लढलो

तुम्ही 105 आमदारांना राजीनामा द्यायला लावा

पुन्हा निवडणूक घ्या आणि आमदारांना निवडून आणून दाखवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT