sanjay raut 1.jpg 
देश

महिलांना समोर उभे करता, ही कसली मर्दुमकी; संजय राऊत भडकले

कार्तिक पुजारी

राज्यसभेत विरोधकांकडून गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकया नायडू व्यथित झाल्याचं पाहायला मिळालं

नवी दिल्ली- राज्यसभेत विरोधकांकडून गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकया नायडू व्यथित झाल्याचं पाहायला मिळालं. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, 'विरोधकांवर ही वेळ का आली? लोकांच्या मनात का राग आहे? तुम्ही आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न का करत आहात? चर्चा करा. संसदेत गोंधळ व्हावं असं आम्हालाही वाटत नाही. आमचे खासदार वेलमध्ये जात नाहीत, पण काल ते गेले. सत्ताधाऱ्यांना विरोधकांचं ऐकून घ्यायचं नाहीये. पंतप्रधान मोदींनी स्वत: समोर येऊन हस्तक्षेप करावा. ते मोठे नेते आहेत. त्यांचं आम्ही ऐकू, पण संसदेत त्यांचं दर्शन झालेलं नाही.'

मार्शल बोलावणे नवी गोष्ट नाही. पण, एखादी दंगल घडते आणि सैनिकांना प्राचारण करण्यात येते, तसे मार्शलना बोलावण्यात आले. जसे हिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर आम्ही उभे आहोत आणि  फक्त बंदुकीच आणायचं शिल्लक होतं. कोणती मर्दुमकी तुम्हाला दाखवायची आहे. खासदारांच्या समोर महिला मार्शल 'कमांडो' उभे करण्यात आले. आम्ही पुढे जाऊन नये म्हणून महिला कमांडोंना उभे करण्यात आले. आमच्या समोर महिलांना उभे करता. ही कसली नामर्दानगी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. रुल बुक फेकून देण्यात आली असेल तर याचा अर्थ सरकाने रुल बुकचे पालन केले नाही. रुल बुक सरकारने वाचावी आणि संसदेत कामकाज चालावं यासाठी रुल बुक फेकण्यात आली होती. नियमानुसार काम चालावं यासाठी असं करण्यात आलं, असं राऊत म्हणाले.

काल ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर चांगल्या पद्धतीने चर्चा सुरु होती. आम्ही एकताने विधेयक मंजूर करुन घेतलं. इन्शूरन्स संदर्भात ही विधेयक आणलं जातंय, त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे आम्ही हे विधेयक उद्या आणण्याची विनंती केली. यावर सहमती झाली होती, पण ओबीसी विधेयक मंजूर झाल्यानंतर लगेच हे विधेयक आणण्यात आलं. त्यामुळे विरोधी पक्षातील सर्व खासदार उभे राहिले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मल्लीकार्जुन खरगे हेही उठले. त्यांनी यावर कारवाई उद्या सुरु करण्याची मागणी केली. त्यामुळे भडका उडाला. आम्ही कधीही वेलमध्ये गेला नाहो. पण, अनिल देसाई वेलमध्ये गेले, असं राऊत म्हणाले.

55 वर्षाच्या कारकिर्दीत मी कोणत्याही सभागृहात असं चित्र पाहिलं नाही. शरद पवारांनाही अस्वस्थपणे बोलावं लागलं. सर्वच नेते अस्वस्थ होते. ज्या नेत्यांनी आपली हयात संसदेत घालवली त्यांनी अशाप्रकारचे दृश्य पाहिले नव्हते. पण, आम्हाला रोखण्यासाठी महिला मार्शल उभे करता, तुम्हाला लाट वाटली पाहिजे, असं म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. आमच्या  मागे  पेगासेस  लावलाय,  तर  संसदेतील   कसली चोकशी  करता,  आमचे  संसदेत  काय  चाललंय  ते तुम्हाला  माहित  असेलच.  आधी  पेगसेसची  चौकशी करावी . विरोधी  पक्षाच्या आजच्या  बैठकीत  शरद  पवार सहभागी  होतील. विरोधी  पक्षांची  युनिटी  आहे ,  २० तारखेला सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांशी सोनिया गांधी  मीटिंग  करणार आहेत. उद्धव  ठाकरे सहभागी  होतील, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; गणेशोत्सव काळात ११ पासून टप्प्याटप्प्याने अंमल, परिवहन विभागाचा आदेश

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT