ShivSena 
देश

Thackeray Petition: नार्वेकरांच्या निकालाविरोधातील ठाकरेंच्या याचिकेवर आता २२ जानेवारीला होणार सुनावणी

यापूर्वी शुक्रवारी ही सुनावणी होणार होती, पण ठाकरे गटानं ही सुनावणी सोमवारी घेण्याची विनंती केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच निकाल जाहीर केला. पण हा निकाल विरोधात गेल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आता सोमवारी २२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. याबाबत ठाकरेंच्या वकिलांनी सरन्यायाधिशांकडं विनंती केली आहे. (Shivsena Uddhav Thackeray Group Marathi News requested to CJI shift hearing from Friday to Monday)

लाईव्ह लॉच्या माहितीनुसार, सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना शिवसेनेच्या वरिष्ठ वकिलांनी विनंती केली की, आपली सुनावणी शुक्रवार ऐवजी सोमवारी ठेवण्यात यावी. त्यामुळं आता ही सुनावणी सोमवार, २२ जानेवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

राहुल नार्वेकरांकडं सर्व पुरावे सादर करुनही शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटातील १६ आमदारांवर घटनेतील १०व्या अनुसुचीनुसार अपात्र ठरवण्यात आलेलं नाही, अशी तक्रार करत ठाकरे गटानं पुन्हा सुप्रीम कोर्टात ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी या याचिकेवर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंतीही यामध्ये करण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

नार्वेकरांनी काय दिला निकाल?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल सुनावताना एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना असून त्यांचा व्हिप भरत गोगावले हाच खरा व्हिप असल्याचं म्हटलं. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचा व्हिप सुनील प्रभूंचा व्हिप शिदेंच्या १६ आमदारांविरोधात लागू होत नाही. त्यामुळं ते अपात्र ठरत नाहीत. तसेच गगावलेंनी काढलेला व्हिप चुकीच्या पद्धतीनं आमदारांपर्यंत गेला त्यामुळं ठाकरे गटाचेही आमदार अपात्र होत नाहीत, असा निकाल नार्वेकरांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT