Shivshakti point Tiranga point eSakal
देश

PM Modi : 'शिवशक्ती' अन् 'तिरंगा'.. चंद्रावरील दोन महत्त्वाच्या जागांचं झालं नामकरण! PM मोदींची मोठी घोषणा

Chandrayaan 3 : पंतप्रधान मोदींनी आज इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेत चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.

Sudesh

पंतप्रधान मोदींनी आज बंगळुरूमध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी एक मोठी घोषणा केली. चांद्रयान-3 चंद्रावर ज्याठिकाणी लँड झालं, त्या ठिकाणाला आता 'शिवशक्ती पॉइंट' असं नाव दिलं जाणार आहे. यासोबतच, चांद्रयान-2 मधील लँडर ज्याठिकाणी क्रॅश झालं, त्या ठिकाणाला 'तिरंगा' म्हटलं जाणार आहे.

'चांद्रयान-3' मोहीम यशस्वीपणे पार पाडून भारताने एक मोठा विक्रम केला आहे. 23 ऑगस्ट रोजी जेव्हा चांद्रयान-3 चंद्रावर लँड झाले, तेव्हा पंतप्रधान मोदी ब्रिक्स समिटसाठी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यानंतर ते ग्रीस दौऱ्यावर गेले. यानंतर भारतात आल्यावर त्यांनी थेट इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेत, चांद्रमोहिमेच्या यशासाठी त्यांचं अभिनंदन केलं.

शिवशक्ती पॉइंट

पंतप्रधान मोदींनी आज इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या वैज्ञानिकांचं अभिनंदन आणि कौतुक केलं. सोबतच त्यांनी एक मोठी घोषणा केली. चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर चंद्रावर ज्याठिकाणी उतरलं आहे; त्या जागेला आता 'शिवशक्ती पॉइंट' म्हटलं जाणार आहे.

तिरंगा पॉइंट

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी आणखी एक मोठी घोषणा केली. भारताची दुसरी चांद्रमोहीम ही अखेरच्या टप्प्यात जाऊन अयशस्वी झाली होती. चांद्रयान-2 मधील विक्रम लँडर हे चंद्रावर क्रॅश झालं होतं. हे लँडर ज्याठिकाणी क्रॅश झालं, त्या जागेचंही नाव पंतप्रधानांनी जाहीर केलं. या जागेला आता 'तिरंगा पॉइंट' म्हणून ओळखलं जाणार आहे.

देशाला देणार प्रेरणा

हे खरंतर चार वर्षांपूर्वीच ठरलं होतं, मात्र चांद्रयान-3 मोहिमेनंतरच एकदमच दोन्ही नावांची घोषणा करण्याचा विचार आपण केला, असं मोदींनी म्हटलं भारताने चांद्रमोहीम यशस्वी करण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाची आठवण हे नाव आपल्याला करुन देईल. अपयश हा शेवट नसतो, हे या नावातून आपल्याला कळेल; असंही मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT