flame
flame file photo
देश

कोरोनाबाधित वडिलांच्या जाण्याचं दु:ख; लेकीची चितेत उडी

कार्तिक पुजारी

कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या वडिलांच्या चितेत महिलेने उडी घेतल्याचा (daughter-throws-herself-into-pyre) धक्कादायक प्रकार घडला आहे.

जयपूर- कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या वडिलांच्या चितेत महिलेने उडी घेतल्याचा (daughter-throws-herself-into-pyre) धक्कादायक प्रकार घडला आहे. यात ३४ वर्षीय महिला मोठ्या प्रमाणात भाजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामोदर सरडा (वय ७३) यांचा कोरोनाची लागण झाल्यानंतर मृत्यू झाला होता. त्यानंतर अंत्यसंस्कार करताना त्यांच्या चितेला आग लावण्यात आली होती. यावेळी त्यांची मुलगी चंद्रकलाने चितेमध्ये उडी घेतली. चंद्रकलाला बाहेर काढण्याचा कुटुंबातील सदस्यांनी प्रयत्न केला. पण, महिला ६० टक्के भाजली आहे. (Shocked-father-death-due-to-Covid-daughter-throws-herself-into-pyre)

वर्मारमधील पोलिस स्टेशनचे एसएचओ प्रेम प्रकाश यांनी सांगितलं की, दुपारी चारच्या सुमारास दामोदर सरडा यांच्या चितेला अग्नी देण्यात आला. यावेळी चंद्रकला यांनी चिचेत उडी घेतली. यावेळी त्यांच्या बहिनीने तिला माघे ओढण्याचा प्रयत्न केला. पण, यादरम्यान चंद्रकला ६० टक्के भाजली होती. महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोविड मृतांसाठी निर्धारित करण्यात आलेल्या जागेऐवजी व्यक्तीचे सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

SCROLL FOR NEXT