Covid-Vaccine-bottles
Covid-Vaccine-bottles 
देश

धक्कादायक! रुग्णालयातून कोरोना प्रतिबंधक लसीचे ३२० डोस चोरीला; गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

जयपूर : देशात सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरु असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राजस्थानातील एका रुग्णालयातून ३२० लसींचे डोस चोरीला गेले आहेत. ही बाब उघड झाल्यानंतर संबंधित रुग्णालय प्रशासनानं पोलिसांत तक्रार दिली असून याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

जयपूरमधील शास्त्रीनगर भागातील कनवाटिया हॉस्पिटलमध्ये मंगळवारी हा प्रकार समोर आला. लसीकरणादरम्यान रुग्णालयाच्या स्टाफला लसींचे डोस अनेकदा शोधूनही मिळाले नाहीत. त्यानंतर याप्रकरणी कलम ३८० अंतर्गत डोस चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञाताविरोधात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून आरोग्य विभाग या बेपत्ता लसींच्या डोसची चौकशी करणार आहे. 

हे चोरीला गेलेले लसींचे डोस बाहेर काळ्या बाजारात विकले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ८ मार्च रोजी राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी दावा केला होता की राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींच्या डोसचा तुटवडा आहे. त्याचबरोबर सध्या देशातील अनेक भागात सध्या लसींचा तुटवडा भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर डोस चोरीला गेल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना प्रतिबंधक लस सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत दिली जात आहे, तर खासगी लसीकरण केंद्रांवर यासाठी २५० रुपये फी आकारली जात आहे. 

रशियाच्या लसीला भारतात परवानगी

दरम्यान, केंद्र सरकार देशात लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळू शकेल. यापार्श्वभूमीवर सरकारने परदेशातील लस अर्थात रशियामध्ये तयार झालेली 'स्पुटनिक व्ही' या कोरोना प्रतिबंधक लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली असून डीजीसीआयनंही या लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे 'कोविशिल्ड', 'कोव्हॅक्सिन'नंतर आता 'स्पुटनिक व्ही' लस देखील भारतात देण्यात येणार आहे.   
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lok sabha result: "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..."; लोकसभेच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय घोषित

Team India Head Coach : लक्ष्मण होणार द्रविड यांचे उत्तराधिकारी? गंभीर, लँगर यांचीही नावे चर्चेत

Google I/O 2024 : जेमिनी 1.5, सर्च एआय अन् बरंच काही.. गुगलच्या इव्हेंटमध्ये काय-काय झालं लाँच? जाणून घ्या

SEBI KYC: कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा; सेबीने KYC संबंधित नियम केले शिथिल, कोणाला होणार फायदा?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी अन् प्रफुल्ल पटेलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला - संजय राऊत

SCROLL FOR NEXT