Atiq Ahmed Murder Case  
देश

Atiq Ahmed Murder Case : "कट्टर "हिंदूत्ववादी - परशुरामचा वंशज" ; अतिक-अश्रफच्या मारेकऱ्यांचा धक्कादायक खुलासा

Sandip Kapde

Atiq Ahmed Murder Case : अतिक-अश्रफच्या मारेकऱ्यांनी पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलीस या तिघांची कसून चौकशी करत आहेत. तिन्ही आरोपींची पोलिसांनी ८ तास चौकशी केली. लवलेश, सनी आणि अरुण या आरोपींची वयैक्तिक माहिती कुटुंब, सवयी याबाबत पोलिसांनी जाणून घेतले.

चौकशीदरम्यान लवलेश तिवारीने स्वतःला कट्टर हिंदूत्ववादी आणि परशुरामचा वंशज असल्याचे सांगितले. लवलेशही सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत:ला प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. तीन मारेकऱ्यांपैकी सनी सिंग याची देखील गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून आली. तर तिन्ही आरोपी आपल्या विधानावर ठाम राहीले.

लवलेश तिवारी, सनी सिंग आणि अरुण यांचा माफिया अतिक अहमदची हत्या करून पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू होता. तर शूटर सनी सिंग म्हणालाल की त्याचा कुणीही गुरू नाही तो स्वतः एक डॉन आहे. अरुणने पानिपतच्या एका मित्राने शस्त्र दिल्याची कबुली दिली.

धोकादायक आणि महागडे पिस्तूल कोणत्या मित्राने दिले?, असे विचारले असता अरुण म्हणाला, हे इतके महागडे पिस्तूल आहे हे मला माहित नव्हते, मी याला एक चांगले शस्त्र मानत होतो. ज्यापासून कोणीही वाचणार नाही. यावेळी सनी सिंगने चौकशीदरम्यान सुंदर भाटी यांच्याशी संपर्क झाल्याचे मान्य केले आहे. हमीरपूर कारागृहात असताना तो सुंदर भाटीच्या संपर्कात आला होता. मात्र कारागृह बदलल्यानंतर पुन्हा कधीही संपर्क झाला नाही.

तिन्ही आरोपी पत्रकार म्हणून आले होते

शनिवारी रात्री प्रयागराजमध्ये अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या अरुण मौर्य, सनी आणि लवलेश तिवारी यांनी केली. तिघेही पत्रकार म्हणून पोलिसांच्या ताफ्याजवळ पोहोचले आणि अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ यांनी मीडियाशी बोलणे सुरू करताच तिघांनीही गोळीबार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT